खामगाव गोदापत्रात पथकाची धाडशी कारवाई

तीन कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त, पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाची धाड

0

माजलगाव, रयतसाक्षी : गेवराई तालुक्यातील खामगांव, सावरगाव येथील गोदावरी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपस्यावर बुधवारी (दि.१६) पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईमध्ये चार हायवा, एक ट्रकसह तीन कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाच्या धाडशी कारवाईमुळे परिसरातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

 

गेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रात सर्रास अवैध वाळू उपसा होत आहे. पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या कारवायांना न जुमानता गोदावरी नदीपात्रात वारंवार अवैध वाळू उपसा होत असल्याने बुधवारी दि.१६ गुप्त माहितीनुसार गेवराई तालुक्यातील खामगाव, सावरगाव शिवारातील गोदापात्रात सकाळी ७ : ०० च्या दरम्यान सपळा रचुन अवैध वाळू उपशावर पथकाने धाड टाकली.

 

दरम्यान, अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांना भनकही न लागू देता पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने काही कळण्याच्या आत गोदावरी नदीपात्रात जायमोक्यावरील चार हायवा, एक ट्रक यासह १९ ब्रास वाळू असा एकून तीन कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाच्या गोदापात्रातील या धाडशी कारवाईमुळे परिसरातील वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले असून एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.