आजोळ परिवार राज्यस्तरीय आदर्श् पुरस्काराने सन्मानीत

दखल : कर्ण् तांबे च्या सेवाभावाची

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : निराधार, वृद्ध, दिव्यांग, अनाथ, मतिमंद व रस्त्यावरील भटकणाऱ्यासाठी देवदूत बनलेल्या आजोळ परिवारास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. आदर्श् प्रतिष्ठाण ट्रस्ट ठाणे च्या वतिने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार प्रकल्पाचे संचालक करण तांबे यांनी नुकताच स्वीकारला असून कर्ण् तांबे याच्या सेवाभावाची खऱ्या अर्थाने दखल घेतल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

तालुक्यात निराधार, असाह्य, दूर्बलांच्या भुकेसह त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध् करून देण्यासाठी धेय्य वेड्या कर्ण् तांबे यांनी राक्षसभुवन येथे आजोळ परिवार नावची स्वखर्चातून माणुसकीची वास्तु उभारली. सन 2011 पासून पासून माहागाईचे चटके सोसत आर्थीक अडचणीच्या महासागरातून आजोळ परिवार या मानवतेच्या नौकेचा प्रवास सुरू आहे. प्रसंगी स्वत: उपासमारीचा कवटाळून निराधार, अनाथ, मतिमंदाची भुक भागवण्याचे श्रम उपसणाऱ्या अवलीयाच्या सेवाभावाची मुंबई येथील ‘आदर्श प्रतिष्ठान’ ने दखल घेत राज्यस्तरीय ‘आदर्श समाजसेवा’  पुरस्काराने सन्मान केला.

 

सन्मानचिन्ह, गौरव पदक, भेटवस्तू, मानवस्र व पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून मान्यवरांच्या हस्ते आजोळ प्रकल्पाचे संचालक कर्ण एकनाथ तांबे यांनी आयोजीत समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. कर्ण् तांबे यांच्या सेवाभावची दखल घेवून त्यांच्या आजोळ परिवारास मिळालेल्या सन्मानाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.