रेल्वे प्रवासात ज्येष्ठांची निराशा

रेल्वे मंत्र्यांनी नाकारली तिकिटात सवलत

0

रयतसाक्षी : देशभरात रेल्वे प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची निराशा झाली आहे. रेल्वे प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना आकारण्यात आलेले पूर्ण् भाडे भरावे लागणार आहे त्यामुळे रेल्वे बोर्डाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी दिली आहे

 

कोरोना कालावधीपूर्वी देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासामध्ये सूट देण्यात येत होती. मात्र मागील दोन वर्षापासून कोरोना कालावधीत रेल्वे बोर्डासह सर्वच क्षेत्र ठप्प झाल्याने  मोठा तोटा सहन करावा लागला. दरम्यान या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. रेल्वे बोर्डाचा तोटा पाहता शासनाने ज्येष्ठांना स्वतंत्र रेल्वे द्वारे प्रवासासाठी सवलत बंद केली. कोरोनाची तिव्रता मंदावल्याने देशभरातील रेल्वे सेवा पूर्वदावर येत असली तरी रेल्वे प्रवासासाठी ज्येष्ठांना पूर्वीची सवलत बंद करण्यात आल्याचे रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्ण्व म्हणाले.

रेल्वे प्रवासामध्ये यांनाच मिळणार सूट

रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्ण्व म्हणाले की, कोरोनामुळे आधीच रेल्वेच्या उत्पन्नावर प्रचंड परिणाम झाला आहे. अशा वेळी ज्येष्ठांना पुन्हा तिकीटात सवलत दिल्यास रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसेल. सध्या केवळ दिव्यांग, गंभीर आजारी रुग्ण व विद्यार्थ्यांनाच रेल्वे तिकीटांत सूट मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.