राष्ट्रवादीकडील जिल्ह्यांच्या पालकत्वात फेरबदल

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिकांच्या जबाबदाऱ्या काढल्या, परभणीच्या पालकमंत्री पदाची सुत्रे डि.एम.कडे तर गोंदीयाचा पदभर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे

0

माजलगाव रयतसाक्षी :  महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रीमंडळाच्या पालकत्वात फेरबदल केले आहेत. यामध्ये परभणी, गोंदीया जिल्ह्यांचा समावेश बीड चे पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. दरम्यान परभणीच्या पालकमंत्रीपदी समाजकल्याणमंत्री धनजंय मुंडे तर गोंदीयाच्या पालकमंत्रीपदावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील बैठकीत सध्या अटकेत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित मोठे निर्णय पक्षाने घेतले आहेत. आघाडी सरकारने मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नसला तरी देखील त्यांच्याकडे असलेल्या विभागाचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

 

तसेच मलिक यांच्याकडील परभणी आणि गोंदिया या जिल्ह्यांची पालकमंत्रिपदे देखील इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्ण घेतला आहे. या निर्णयानुसार, मलिकांकडे असलेले परभणीचे पालकमंत्रिपद धनंजय मुंडे आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर पाटील हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.