धुलीवंदन, रंगपंचमीचा सदोदित आनंद मिळो – आमदार श्वेता महाले

बंजारा समाजाच्या पारंपारिक होळी उत्सवात सहभाग, सदाचाराचे रंग उधळून आंनद साजरा

0

माजलगाव, चिखली, रयतसाक्षी: होळी म्हणजे मनसोक्त आनंद लुटण्याचा सण. स्वतःला रंगवून इतरांनाही रंगात न्हावू समावेशक आनंदात सहभागी करणाऱ्या होळी सनाला हिंदू संस्कृतीत अनन्य साधारण महत्व आहे. अशी आनंदाची रंग उधळन करत आमदार श्वेता महाले पाटील यांनी बंजारा समाजाच्या पारंपारिक होळी महोत्सवात सहभाग घेत नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

आपसातले मतभेद विसरून एकमेकांवर रंगाची उधळण करणारा हा होळी सन. आपल्या आयुष्यात किंवा वर्षभरात येणारे दु:ख, अशांती, उदाशीनता, ह्या गोष्टी समर्पीत करणारा दिवस म्हणजे धुळवड. होळी हा बंजारा समाजाचा प्रमुख सन मनला जातो, धुळवड ही बंजारा समाजाची कलाविष्काराने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या धुळवड महोत्सवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले पाटी यांनी सदाचाराच्या रंगाची उधळण करत धुलीवंदन साजरे केले. दरम्यान, असे सण दररोज असेल तरी प्रत्येक जण त्याला आनंदाने साजरा करतील . असाच आनंद सर्वांच्या जीवनात येऊन सर्वत्र जनतेला रंग पंचमीच्या दिवशी मिळणारा आनंद दररोज मिळो अशा शुभेच्छा आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी धुलीवंदनाच्या पर्वावर नागरिकांना दिल्या .

 

धूलिवंदनाचा लुटला आनंद : चिखली येथे परिसरातील मैत्रिणी, सहकार्‍यांसमवेत मुक्तपणे रंगांची उधळण करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.  नेहमीच्या चिंता, विचार दूर ठेवून वर्षातून एक दिवस तरी मनसोक्त आनंद लुटावा म्हणून भारतीय संस्कृतीत होळी,  धुळवड या सणाला अनन्य साधारण महत्व आहे.  या दिवशी सर्वांच्याच मनातील नकारात्मकता नष्ट होऊन पुढे वर्षभरासाठी मन ताजेतवाने होते. त्यामुळे सर्वांनीच मनमुरादपणे या सणाचा आनंद लुटावा,  असे आवाहन आमदार श्वेता महाले पाटील यांनी यावेळी केले.

बंजारा होळीचा वेगळाच थाट

चिखली मतदारसंघातील मौजे हरणी येथे बंजारा समाजाची जेमतेम लोकसंख्या आहे. धुलीवंदन हा बंजारा समाजाचा प्रमुख सण , हा सण ते मोठ्या उत्साहात साजरा करतात.

आमदार श्वेता महाले पाटील यांनी हरणी येथे बंजारा समाज बांधवांसमवेत होळी, धुलिवंदन साजरे केले. बंजारा समाजात होळीचा सण साजरा करण्याची प्रथा फारच वेगळी असून मनाला अति आनंद देणारी आहे. नृत्य, गाणी व होळीचे रंग असा हा त्रिवेणी संगम अनुभवास मिळतो.

 

होळी आयी ये होळी डगर चाली।

होळी गेरीयान सुनो रकाड चाली।।

अशी विविध गीते गाणार्‍या बंजारा भगिनींसमवे पारंपरिक बंजारा नृत्यात सहभागी होऊन त्यांनी नागरिकाना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पदाधिकारी, समाजबांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.