प्रकाश चव्हाण यांची गोरक्षा मंच जिल्हाध्यक्षपदी निवड

प्रकाश चव्हाण यांना नियुक्तपत्र देवून शुभेच्छा देण्यात आल्या

0

माजलगाव, रयतसाक्षी: राष्ट्रीय गोरक्षामंच च्या जिल्हाध्यक्षपदी व्यापारी प्रकाश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या पादाधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री प्रकाश चव्हाण यांना नियुक्तपत्र देउन शुभेच्छा देण्यात आल्या.

 

तालुक्यातील शुक्लतीर्थ लिमगाव येथील व्यापारी प्रकाश चव्हाण यांची राष्ट्रीय गोरक्षा मंच जिल्हाध्यक्षपदी  निवड करण्यात आली. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मोहन जगताप, अध्यक्ष राष्ट्रीय गोरक्षा मंच मुरली लव्हाळे,  युवा तालुकाध्यक्ष रोहित नावंदर, वैभव कदम, राजाभाऊ बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देवून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.