माजलगाव – तेलगांव रोडवर कार दुचाकीचा भिषण अपघात

दोन ठार सहाजण जखमी

0

 

माजलगाव, रयतसाक्षी : इर्टीगा कार व दुचाकीचा भीषण अपघात होऊन यामध्ये दुचाकीवरील दोघे ठार तर १० वर्षांचा मुलगा गंभीर जखमी असून, कारमधील ५ असे एकूण सहा जण जखमी आहेत. या सर्वांना बीड व‌ नंतर अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कार मधील पाचही जखमी शिक्षक असून ते माजलगाव ते अंबाजोगाई अशी ये-जा करतात.

 

माजलगाव- तेलगाव रोडवर शनिवारी दि.१९ कार आणि दुचाकीचा भिषण अपघात झाला या अपघातात लक्ष्मण भिमराव विघ्णे ( वय ४५ वर्ष ), सिध्देश्वर प्रल्हाद जाधव ( वय ३५ वर्ष ) हे जागीच ठार झाले. दरम्यान हे दोघे व सिध्देश्वर यांचा मुलगा इश्वर जाधव हे तिघे पाहूण्याना भेटून दुचाकीवर येत होते. हा अपघात एवढा भिषण होता की, दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली जाऊन खड्ड्यात पडली. यामध्ये दुचाकीवरील तिघांना गंभीर मार लागल्याने लक्ष्मण विघ्णे आणि सिध्देश्वर जाधव हे जागीच ठार झाले. तसेच इश्वर जाधव ( वय १० वर्ष ) हा गंभीर जखमी झाला.

 

तसेच इर्टीगा कार ही खड्ड्यात जाऊन पडली असून यातील नामदेव हेडे ( वय ४४ वर्ष ), परमेश्वर खेमाजी पवार ( वय ४५ वर्ष ) प्रीती विनोद पोखरकर ( वय ३५ वर्ष ), भारत अबाजी माने, किशोर रामभाऊ ठाकुर ( वय ३७ वर्ष ), ज्योती शंकर कदम जखमी आहेत. हे सर्व माजलगाव येथील सिध्देश्वर विद्यालयात शिक्षक आहेत. अंबाजोगाई येथे रहातात व तेथून माजलगाव येथे शाळेसाठी अप्डाऊन करतात. आजही नेहमी प्रमाणे शाळेला जाताना शिंदेवाडी फाट्यावर ही घटना घडली आहे. सर्व जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.