आमदार वडपुरकर यांच्या स्वखर्चातून शेतरस्त्याचे भूमिपूजन

पोहंडूळ शिवारातील शेतकऱ्यांची समस्या मिटणार - प्रेरणा वडपूरकर

0

माजलगाव, रयतसाक्षी: सोनपेठ तालुक्यातील पोहंडूळ शिवारातील शेतकऱ्यांना रस्त्या अभावी समस्यांना तोंड द्यावी लागत होती. अनेक वेळा रस्त्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार सुरेश वडपूरकर यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न लक्षात घेऊन आमदार श्री. वडपूरकर यांनी स्वखर्चातून रस्ता निर्माणाचे अश्वासन दिले. त्यानुसार प्रेरणा वडपूरकर यांनी शेतरस्त्याचे भुमिपूजन केले.

 

पोहंडूळ शिवारात शेतरस्त्या अभावी शेतकऱ्यांना शेतमशागतीसह दळण – वळणासाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावी लागत होती. हक्काच्या शेतरस्त्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी वारंवार शासन, प्रशासन दरबारी पाठपुरवा केला. मात्र, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे अक्षम्य दूर्लक्ष करण्यात आले. कैफियत मांडूनही शेतकऱ्यांच्य मागणीला बगल देण्यात येत असल्याने शेतरस्त्या अभावी लहान मोठ्या वादाला तोंड फुटत होते.

दरम्यान, शेत मशागतीसाठी यंत्र सामग्रींची ने-आण करण्यासह शेती उत्पादानाच्या वाहतूकीसाठी शेतरस्त्याचे महत्व वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार सुरेश वडपूरकर  यांच्याकडे कैफियत मांडली. शासन, प्रशासन दरबारी शेतकऱ्यांची शेतरस्त्याची अडचण दूर होत नसल्याचे लक्षात येताच आमदार श्री वडपूरकर यांनी शेतकऱ्यांना स्वखर्चातून शेतरस्ता निर्माण करून देण्याचे अश्वासन दिले. शेतकऱ्यांना दिलेली अश्वासनपुर्ती म्हणून आमदार सुरेश वडपूरकर यांच्या स्वखर्चातून प्रेरणा वडपूरकर यांनी पोहंडूळ शिवारातील शेत रस्त्याचे भुमिपूजन करून प्रत्यक्षात रस्ता कामाला सुरवात केली.

 

आमदार सुरेश वडपूरकर यांनी दिलेल्या अश्वासानपूर्तीने परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हसू फूलले शिवाय पिढीणपार शेतररस्त्याची समस्या मिटल्याचा आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी प्रा. डॉ. मुंजाभाऊ धोंडगे, जगन्नाथ कोलते, तानाजी भोळे, सुदर्शन कदम, लक्ष्मण यादव  आदींसह ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.