व्हॉट्सअप टेटस् ठेऊन आगरनांदूरमध्ये युवकाची आत्महत्या

बाहेर धुलीवंदनाचा जल्लोष, घरात गळफास घेऊन संपवले जीवन

0

माजलगाव, रयतसाक्षी: व्हाट्सअपवर, आय मिस यु माय लव्ह, मिस यु फ्रेंड,  बाय माय जिगरी स्वारी असे स्टेटस ठेऊन बाहेर धुलिवंदनाचा जल्लोष सुरु असताना एका २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई  तालुक्यातील आगरनांदूर येथे उघडकीस आली आहे.

 

तालुक्यातील आगरनांदूर येथील नितीन चिमाजी निर्मळ वय  (२३ वर्षे) हा शुक्रवारी दि. १८  धुलीवंदनामुळे गावात होता. रंगाची उधळण करत गावात सर्वत्र धुलिवंदनाचा जल्लोष सुरू होता.

 

नितीन निर्मळ याने आपल्या व्हॉट्सअपवर | miss you, my love,miss you friend, bay, my jigri, Sorry, शेवट’ असे स्टेटस ठेवले होते. धुलिवंदनामुळे नितीनचे टेटस् कडे कोण्या मित्राचे कदाचीत फारसे लक्ष गेले नसावे. सोशल मीडियाच्या व्हॉटस्अपवर अशाप्रकारे टेटस् ठेऊन नितीन निर्मळ याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एकीकडे धुलिवंदनाचा जल्लोष तर दूसरीकडे व्हॉटस्अपवर टेटस् ठेऊन घरात गळफास घेऊन आत्महत्येच्या प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.