कोल्हापुरच्या पोटनिवडणूकीत करूणा शर्मा यांची एट्री

राज्याच्या राजकारणात नविन पक्षाची भर, पक्ष स्थापने नंतर पहिलीच निवडणूक

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा बिगूल वाजला आहे. तत्कालीन काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापुर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. दरम्यान मविआ चा शत्रु पक्ष् भाजपला रोखण्यासाठी रननिती आखण्यात आली असली तरी आता राज्याच्या राजकारणात शिवशक्ती या नविन पक्षाची भर पडली आहे. पक्षप्रमुख करूणा शर्मा या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याने शक्तीपिठाच्या राजकिय आखाड्यात शिवशक्ती पक्षाचा जागर होणार का हे  पहावे लागणार आहे .

 

कोल्हापुर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. जाहिर कार्यक्रमानुसार दि.१२ एप्रिल रोजी मतदान होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी करुणा शर्मा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत करुणा शर्मा शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार आहेत. शिवशक्ती हा करुणा शर्मा यांचा पक्ष आहे. शर्मांनी स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. शिवशक्ती पक्ष स्थापन केल्यापासून करुणा शर्मा यांची ही पहिली निवडणूक आहे.

 

दरम्यान, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्या नंतर करूणा शर्मा चर्चेत आल्या, त्या नंतर परळी येथे पत्रकार परिषद घेण्यासाठी गेलेल्या करूणा शर्मा यांच्या गाडीत मिळून आलेले अवैध रिव्हॉल्व्हर प्रकरणी झालेली अटक व जेल या प्रकरणामुळे राज्यात करूणा शर्मा यांचे नाव चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर अवघ्या महिणाभरातच समाजातील वंचित उपेक्षीतांना न्याय देण्यासाठी राजकारणात उतरणार असल्याचे अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत जाहिर केल्या नंतर अवघ्या काही दिवसात शिवशक्ती पक्षाची स्थापना करून राजकिय आखाड्यात उतरणार असल्याचे सुतोवाच करूणा शर्मा यांनी अहमदनगर येथे एका पत्रकार परिषदेत केले होते.

 

त्यानंतर आता कोल्हापुर  या पोटनिवडणुकीत भाजपकडून सत्यजित कदम यांचे नाव निश्चित असल्याच्या चर्चा आहेत. सत्यजित कदम हे गेल्या १० वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत. २०१४ च्या कदमांनी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. कदम हे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नातेवाईक आहेत. ही निवडणूक बिनविरोध होईल, अशा शक्यता वर्तवली जात होती. परंतु, सर्व पक्ष त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत.

काँग्रेसची पुनरावृत्तीची तयारी

काँग्रेस पक्षाने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यात काँग्रेसची उमेदवारी देण्याचा मुद्दा चर्चेत असला त्याला अधिकृत दुजोरा मिळत नाही. पंढरपूर मतदार संघात पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ( भगीरथ) भालके घराणे पराभूत झाल्याचा संदर्भ देऊन कोल्हापुरात काँग्रेसला उमेदवारी दिल्यास अडचणी येऊ शकतात असा एक निष्कर्ष नोंदवला जात आहे.

 

तर काँग्रेसकडून नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या वारसादारांनी विजय मिळवला होता, असे सांगून निरुत्तर केले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी मविआच्या माध्यमातून पोट निवडणुकींना सामोरे जाण्याचे आणि तिन्ही पक्षांचा मुख्य शत्रू असलेल्या भाजपला पराभूत करणे हे लक्ष्य ठेवले आहे. त्याचप्रमाणे पुढील वाटचाल होईल असाही मुद्दा मांडला जात आहे.

 

दरम्यान कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार होते. त्यामुळे काँग्रेसला उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन दिवसात भेट घेतली जाणार आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. त्यांच्या भूमिकेला पािठबा राहील अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ याच भूमिकेशी जोडले गेल्याचे दिसते.

भाजप यशासाठी उत्सुक

भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती प्रदेश सचिव मकरंद देशपांडे यांनी सोमवारी घेतल्या. एकंदरीत कल पाहता गतवेळी काँग्रेसकडून या मतदारसंघात निवडणूक लढवलेले आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी नगरसेवक सत्यजित कदम यांना उमेदवारी यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे विधानसभेचे संख्याबळ दोनवरून शून्यावर आले आहे.

 

पोटनिवडणुकीच्या माध्यमातून खाते उघडण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याने ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. या निकालाचे निकालाचे परिणाम कोल्हापूर महापालिका निवडणुकीवर होणार असल्याने त्या दृष्टीने हि निवडणूक महत्त्वाची आहे. याच वेळी आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, शेतकरी संघटनेचे राजेश तथा बाळ नाईक अशा काही उमेदवारांनी ताकद जमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

 

उमेदवारीसाठी चाचपणी  निवडणूक जाहीर झाल्यानंतर रविवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उत्तरची उमेदवारी शिवसेनेला मिळावी अशी ठाम मागणी करण्यात आली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गेल्या सातपैकी पाच वेळा या मतदारसंघात शिवसेनेचा विजय झाला आहे. काही सव्‍‌र्हेतून काँग्रेसची उमेदवारी अडचणीत असल्याने शिवसेनेला उमेदवारी दिल्यास यश मिळेल असा दावा केला आहे.

 

तर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मित्रपक्षांकडून शिवसेनेला रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा उल्लेख करतानाच उमेदवारीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असे स्पष्ट केले आहे. आता मातोश्रीवरून कोणता कौल मिळतो यावर निवडणुकीची गणिते अवलंबून असणार आहेत. मविआतील वारसांना उमेदवारी सोबत राहण्याचा मातोश्रीचा याआधीच्या निवडणुकीतील निर्णय कायम राहतो की कोल्हापूरच्या निमित्ताने त्यात बदल घडतो याचेही कुतूहल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.