ऊस वाहतूक ट्रॅक्टर सुसाट, ट्राली मात्र मोकाट…!

रिफ्लेकटेड इंडिकेटर नसल्याने अपघातात वाढ, ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना नियमांचा विसर

0

माजलगाव, वेदांत गोपाळ: तालुक्यात साखरद कारखाने जोमात सुरू असून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक ऑडिओ टेपचा कर्णकर्श आवाजा करत सूसाट वाहन चालवत आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या बहूतांश ट्रॅक्टर चालकांनी मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टिम बसवली आहे. आधिच ट्रॅक्टरचा मोठा आवाज त्यातच टेप रेकॉर्डचा कर्णकर्श आवाज नारिकांना नकोसा झाला आहे. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत मर्यादापेक्षा अधिक बोजाची वाहतूक त्यातच ट्रॉलीस रिप्लेक्टर नसल्याने ऊस वाहतूक ट्रॅक्टर अपघातास निमंत्रण देत आहेत. वेळीच या ट्रॅक्टर चालकांना शिस्त लावण्याची मागणी होत आहे.

 

तालुक्यात साखर कारखाने जोमात सुरू असल्याने मुख्य रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा कामय जाम असतो. त्यातच प्रमाणापेक्षा जादा ऊस, विनापासिंग ट्रॉलीचा वापऱ, वाहतूक नियमांचे उल्लंघन, पुरेशा खबरदारीचा अभाव,  शिकाऊ ट्रॅक्टर चालकांकडून सदोष वाहतूक अशा एक ना अनेक कारणांमुळे ऊस वाहतूक करणा ऱ्या वाहतुकीचा प्रश्न शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक रस्त्यावरून धावणाऱ्या अन्य वाहन चालकांच्या जीवावर उठल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे़. त्यामुळे अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

 

नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्याच बरोबर काही चालक मद्यप्राशन करून साउंड सिस्टीमचा आवाज वाढवून ट्रॅक्टर दामटतात. त्यामुळे हे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर इतर वाहनचालकांच्या जिवावर उठल्याची स्थिती आहे. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात उसाची वाहतूक होते. रस्ता नागमोडी, उताराचा व चढावाचा असल्यास चालकांचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटल्याच्या घटना घडल्या आहेत.

 

रिफ्लेक्टर नसल्याने अपघात वाढले:

तालुक्यातील रस्त्यांवर सध्या ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक आदी वाहनांची वर्दळ वाढली आहे. दिवसभर, रात्री-अपरात्री ही ऊस वाहतूक सुरू असून, वाहनचालक अनेक वेळा रस्त्यावरच वाहन पार्किंग करून जातात.

रिफ्लेक्टर नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्या अंधारात ट्रॉलीचा अंदाज न आल्याने ट्रॉलीला धडकून कित्येक दुचाकीस्वारांचे नाहक बळी गेले आहेत. याबाबत प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.  यामध्ये प्रामुख्याने रस्त्याकडेला थांबविण्यात आलेली ऊस वाहतूक करणारी वाहने अधिकतर धोकादायक ठरत आहेत.

 

कडक पावले उचण्याची गरज:

साखर कारखाना व्यवस्थापन व कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्यांनी याबाबत ठोस कार्यवाही करून ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाडी, ट्रक मालकांना रेड रिफ्लेक्टर लावण्यास प्रवृत्त करण्याची गरज आहे. तरी प्रशासनाने रिफ्लेक्टर संदर्भात कडक पावले उचलण्याची गरज आहे.

वाहन चालकांनी काळजी घ्यावी:

ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर,ट्रक तसेच बैलगाडी यांना रिफ्लेक्टर बसवण्याच्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहनांची पाहणी करण्यात येत आहे. एवढेच नाही तर कारखाना व्यवस्थापकांना वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याचा अनुषंगाने सूचना करण्यात येतात. वाहनचालकांनी स्वतः सोबतच दुसऱ्याची काळजी घ्यावी.

रामदास पालवे – सह.पोलिस निरीक्षक माजलगाव

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.