राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी गोणारकर

शहर कार्याध्यक्ष पदी शेट्टी यांची निवड

0

 

धर्माबाद, रयतसाक्षी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी माजी नगरसेवक भोजराज गोणारकर तर धर्माबाद शहर कार्याध्यक्ष पदी माजी नगरसेवक रविंद्र शेट्टी यांची निवड पक्षातील वरीष्ठांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केले आहे.

 

माजी नगरसेवक भोजराम गोणारकर, माजी नगरसेवक रविंद्र शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले आहेत. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वंचित, शोषीत, दूर्लक्षीत  घटकांचे पाठबळ ही जमेची बाजू राहीली आहे. मागील काळात तालुक्यात  राष्ट्रवादीची झालेली पडझड व त्या पासून निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पदाचा वापर करणार असल्याचे श्री गोणारकर, शेट्टी यांनी सांगितले.

 

मतभेदासह इतर कारणामुळे राष्ट्रवादीपासून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एकजूटीची मोट बांधण्यात श्री गोणारकर, श्री शेट्टी यांना जनसंपर्कामुळे अवगत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, पक्षाची पडझड सुरू असताना एकनिष्ठ राहून गोणारकर व शेट्टी यांच्यासह तालुकाध्यक्ष हनमंत पाटील जंगदंबे पिंपळगावक, युवकचे तालुकाध्यक्ष नागेंद्र पाटील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले आहेत.

 

कार्यकर्त्यांच्या कर्तव्यकठोर धोरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटी आली आहे.  पक्षाणे सोपविलेल्या जबाबदारीमुळे लवकरच तालुक्यातील अनेक मान्यवरांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश होणार असल्याचेही उपस्थितामधून भावना व्यक्त केल्या जात होत्या. एकनिष्ठते बरोबर केलेल्या कामाची पावती म्हणून पक्षाने श्री. गोणारकर व शेट्टी यांच्यावर जबाबदारी सोपिवल्याचे बोलले जात आहे.

 

आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये या निवडीचा पक्षाला फायदा होईल यात शंका नाही. जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे राष्ट्रवादीच्या आयोजीत जिल्हा सरचिटणीस पदी माजी नगरसेवक भोजराम गोणारकर तर धर्माबाद शहर कार्याध्यक्ष पदी रविंद्र शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भगवानराव पाटील आलेगावकर,  डी. बी. जांभरुमकर, महीला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष प्रांजली रावनगावकर, डॉ वडपत्रे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत मांजरमकर, तालुकाध्यक्ष हनमंत पाटील जंगदंबे पिंपळगावकर,  युवकचे तालुकाध्यक्ष नागेंद्र पाटील चोळाखेकर, युवक सरचिटणीस शंकर पाटील पिंपळगावकर अदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.