पाचशे रूपयांची लाच घेताना तलाठी चतुर्भूज

फेरसह सरकारी कागदपत्रांसाठी मागीतली लाच, बीड एसीबीची कारवाई

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : फेरनोंदीसह इतर सरकारी कागदपत्रासाठी पाचशे रूपयाची घेताना गोमळवाडा सज्जाचे तलाठी सध्या शिरूर मंडळ अधिकारी कार्यालयात कार्यरत लाच लूचपत प्रतिबंध विभागच्या जाळ्यात सापडल्याने तालुका महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील गोमळवाडा सज्जा अंतर्गत तक्रादाराच्या फेरनोंदीसह सातबारा आदी कागदपत्रासाठी तलाठी नामदेव पाखरे यांनी एक हजार रूपये लाचेची मागणी केली. बीडच्या लाच लूचपत प्रतिबंध विभागास प्राप्त तक्रारीनुसार खात्री करण्यात आली. त्यानुसार लाचलूचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ. राहूल खाडे, अप्पर पोलिस अधिक्षक विशाल खांबे, उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखली एसीबीने ठरवलेल्या कालावधीत सोमवारी दि.२१ रोजी सापळा लावला. नियोजीत प्रक्रियेनुसार तक्रारदारा सोबत एका कर्मचाऱ्यास पाठवले. तलाठी नामदेव पाखरे यास तक्रारदाराकडून ठरवलेली पाचशे रूपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

दरम्यान, एसीबीच्या कारवाई पेक्षा तालुक्यात लाचेच्या रकमेची अधिक चर्चा होत आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील काही सरकारी बाबु केवळ पाचशे रूपयांची ही लाच सोडत नसल्याचा प्रत्यक्ष अनुभव तालुकावासीयांना आला असे म्हणने वावगे ठरणार नाही. महसूल प्रशासच्या पारदर्शी कारभारासाठी नागरिकांनीच आता पुढे येण्याचा  बोध या कारवाईतून घ्यायला हवा. तालुक्यात अवैध रेती उपसा प्रकरणाने महसूलमधील काहींचा आहेर मोड होत असल्याचे बोलले जात असले तरी, अवैध रेती विषयी लाचलूचपत चा प्रश्न मात्र गौण आहे. पण  सरकारी कागदपत्रांसाठी केवळ पाचशे रूपयांची लाच स्वीकारल्याने महसूल प्रशासन चांगलच चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.