संयुक्त किसानसभेचे पाटोदा तहसील समोर बोंबमारे आंदोलन

सन २०२० च्या पिकविमा पासून पाटोदा, शिरूर तालुकेच विम्यापासुन वंचित का ? :कॉ.महादेव नागरगोजे

0

पाटोदा, रयतसाक्षी : शासनाच्या निष्काळजी धोरनामुळे जिल्ह्यातील केवळ पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील शेतकरी सन २०२० च्या पिक विम्यापासून वंचित आहेत, सरकारच्या काळजीवाहू धोरणमुळे ऐन परीक्षेच्या कालावधीतच विजवितरण कंपणीकडून सातत्याने विजपुरवठा खंडीत केला जात असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची भिती व्यक्त करत सोमवारी दि.२१ प्रा. सुशीलाताई मोराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉ महादेव नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त किसान सभेच्या वतिने पाटोदा तहसील कार्यालयावर मोर्चा काढत बोंब मारो धरणे आंदोलन करण्यात आले.

 

एकून बीड जिल्ह्यात पाटोदा व शिरूर कासार तालुकेच सन २०२० च्या पिक विम्या पासून वंचित का राहिले हा नेमका कोणाचा दोष आहे. ऐन परिक्षाच्या काळात वीज वितरण कंपनीने जो गोंधळ घातला आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीचे भविष्य अंधकारमय होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने जे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई राज्य सरकारने करावी. असे प्रतिपादन कॉ.महादेव नागरगोजे यांनी केले.

सोमवारी दि.२१ मार्च रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष,किसान सभा व शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीने पाटोदा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून  बोंबमारो धरणे आंदोलन करण्यात आले होते.हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चात शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांनी विमा कंपनी, वीज वितरण कंपनी, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत बोंबमारो आंदोलन केले.या आंदोलनाला शेतकरी संघर्ष समितीच्या अध्यक्षा प्रा.सुशिलाताई मोराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या की.केंद्र सरकार व तिन पक्षाच्या सरकार मध्ये पीक विमा संदर्भात टोलवाटोलवी चालू आहे. तुमचा वाद तिकडेच चालू ठेवा मात्र आमच्या शेतकऱ्यांचे जे हक्काचे आहे ते त्यांना मिळाले पाहिजे. जर याकडे दुर्लक्ष करण्यात येत असेल तर या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना व पालकमंत्री यांना सुध्दा आम्ही फिरू देणार नाही. असा इशारा प्रा.सुशिलाताई मोराळे यांनी दिला. मार्चेकऱ्यांच्या शिष्ठमंडळाने तहसीलदार रूपाली चौगुले यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी कॉ.महादेव नागरगोजे, कॉ.सुधाकर सिरसट,कॉ.विठ्ठल पवळ, कॉ.दत्तु सिरसट, कॉ.बाजीराव पवळ,संतोष बांगर, मुरली आबा बांगर, विशाल बांगर, भागवत नागरे, मोहन सोनवणे, कॉ.अतुल देवडे आदींसह आंदोलनकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.