माजी खासदार जयसिंग गायकवाड यांचा कार्यकर्ता संवाद

राष्ट्रवादीची तालुका आढावा बैठक, मशागत आगामी निवडणूकीची

0

 

शिरूर कासार, रयतसाक्षी : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दि. २२ शिरूर कासार तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार जयसिंग गायकवाड, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील कार्याचा आढावा घेण्यात आला. प्रसंगी माजी खासदार जयसिंग काका गायकवाड यांनी शहरातील कार्यकर्त्यांशी डोअर टू डोअर संवाद साधला.

नगरपंचायत निवडणूकीत निसटत्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगीलच कामाला लागली आहे.  तालुक्यातील कार्यकर्त्यांची मरगळ झटकून टाकण्यासाठी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी युवकांशी थेट संवाद वाढवला आहे. नगरपंचायतीचा वचपा काढण्यासाठी आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांची रननिती आखण्यास महबुब शेख यांनी सुरूवात केली आहे.

 

ग्रामीण् भगात पुरेशा कार्यकर्त्यांचा लवाजमा असला तरी, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांचे अव्हान प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या समोर आहे. नगरपंचायत निवडणूकांमध्ये झालेल्या चुकांची दूरूस्ती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांच्या विजयाने भरून निघणार असल्याने आता महेबुब शेख यांनी ग्रामीणवर भर दिल्याचे चित्र आहे.

 

दरम्यान, प्रदेशाध्य निवडीनंतर पहिल्याच निवडणूकीला सामोर जाताना नगरपंचायत निवडणूकीमध्ये जवळचे परके ओळखण्यात जरी काही उनिवा राहिल्या असल्या तरी तीन जागा थोड्या मतावून गेल्या. पण चार नगरसेवकांचे संख्याबळ मिळविण्यात महेबुब शेख यांना यश आले. ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे संख्याबळ आणि पक्षाला माणनारा मोठ्या वर्ग आहे.

पक्षाची मोठी जबाबदारी नसताना महेबुब शेख यांनी आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखली मागील पंचवार्षीक निवडणूकांमध्ये जिल्हा परिषेदेच्या चार पैकी एक तर पंचायत समितीच्या आठ पैकी चार जागांवर राष्ट्रवादीला निर्वीवाद वर्चस्व मिळवून दिले . ग्रामीण भागात विकास कामाबरोबर  कार्यकर्त्यांची एकजूट पक्षाला माणनारा वर्ग महेबुब शेख यांच्या जमेच्या बाजू आहेत.

 

आगामी निवडणूकांना समोरं जाताना कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण करून मतदारांचा विश्वास मिळविण्याच्या दिशेने महेबुब शेख यांची मशागत सुरू आहे. आढावा बैठकीच्या निमीत्ताने नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्षांना थेट गावपातळीवरील कार्यकर्त्यांच्या शेजारी बसवून शेख यांनी निवडणूकांसाठी सकारात्मक संदेश दिला. ज्येष्ठ नेते माजी खासदार जयसिंग गायकवाड यांनी त्यांच्या धेय्य धोरणांनुसार शहरातील हितचिंतक, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत नगरपंचायत पंचायत निवडणूकीतील खास- खोलग्यासह आगामी काळातील निवडणूकीचा मागोवा घेतला. पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी तालुक्यातील ग्रामीण भगाचा आढावा घेताला.

 

प्रदेशाध्यक्ष शेख यांच्या नेतृत्वावर विश्वास : आढावा बैठकीसाठी उपस्थित तालुक्यातील तळगळातील कार्यकर्त्यांनी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याच्या भावना व्यक्त करत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांना एकजूटीने समोरं जाऊन पक्षाचे विचार आणि धेय्य धोरण घरा-घरात पोहचविण्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास असल्याने आगामी निवडणूकीत विजयाचा विश्वासही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.