माजलगाव शहरात उद्भवल्या आरोग्याच्या समस्या

स्वच्छतेचा अभाव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्षाची उपाय योजनांची मागणी

0

माजलगाव, रयतसाक्षी: माजलगांव शहरात सर्वत्र घाणीच्या साम्राज्यामुळे विवध प्रजातींच्या डासांची उत्पत्ती होत आहे. स्वच्छेतअभावी डासांच्या प्रादूर्भावामुळे विवध साथरोगांनी डोके वर काढल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावी लागत आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ उपाय योजना करून शहरात सर्वत्र स्वच्छता मोहिम राबवण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष क्षितीज गायकवाड यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

शहरात सफाई अभावी गल्ली बोळात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा व्यवस्थापना अभावी दूर्गंधीमुळे नगारिकांना नाक दाबून वावरावे लागत आहे. तुंबलेल्या नाल्यातील सांडपाण्यातून सुटणाऱ्या दूर्गंधी त्यातच विविध प्रजातींच्या डास उत्पत्तीमुळे शहरसवासीयांना सर्दी, खोकला, ताप, उलट्या अशा विवध आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावी लागत आहे.

 

सफाई अभावी दूर्गंधीयुक्त सांडपाण्याने तुंबलेल्या नाल्यामध्ये ड्येंग्यू, मलेरिया सारख्या गंभीर आजाराला सामोरं जाव लागत आहे. शहरात गल्ली बोळात साथरोग प्रतिबंधात्मक धुर फवारणी करून सर्वत्र स्वच्छता अभियान राबण्यात यावे ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य अबाधीत राहील. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ उपाय योजना राबवाव्यात अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा विदयार्थी काँग्रेस शहराध्यक्ष क्षीतीज गायकवाड, प्रमोद तौर यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.