लसिकरणासाठी गोमळवाड्यात आरोग्य कर्मचारी थेट बांधावर

लसीकसणासाठी नागरीकांनी पुढे यावे- आजीनाथ गवळी

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : तालुक्यात कोरोना नियंत्रणासाठी सर्वच स्तरातून मोठी कसरत सुरू असल्याने नागरिकांना दिलासा मिळून बाधितांची संख्या नगण्य झाली आहे. आरोग्य विभागाच्या सुयोग्य नियोजनामुळे कोरोना सारख्या बलाढ्य महामारीपासून सध्यातरी दिलासा मिळत असला तरी, यावर लसिकरण हाच एकमेव उपाय असल्याने तालुका आरोग्य विभागाच्या कालबध्द कार्यक्रमानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांच्या मार्गदर्शनाखली डॉ. किशोर खाडे यांच्या नियोजनातून नागरिकांचा वेळेसह पैसा वाचवण्यासाठी गोमवाडा येथे मंगळवारी दि.२२ आरोग्य कर्मचारी थेट शेताच्या बांधावर पोहचले. दरम्यान संभाव्य काळात कोरणावर मात करण्यासह सदृढ आरोग्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे अवाहन सामाजीक कार्यकर्ते आजिनाथ् गवळी यांनी केले आहे.

कोराना महामारीवर मात करण्यासाठी शासनस्तरावरून आरोग्य विभागाने आखलेल्या कालबध्द कार्यक्रमानुसार तालुका आरोग्य विभागअंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे थेट जायमोक्यावर लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान लसीकरणासाठी वाट न पाहता थेट नागरिकांना घरपोहच लसिकरणाचा लाभ देणाऱ्या आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

 

लसिकरणासाठी ठिकठिकाणी कॅम्प लावल्यानंतर संभाव्य काळात कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सुरू असलेल्या घरपोच लसिकरण उपक्रमाद्वारे मंगळवारी दि.२२ आरोग्य कर्मचाऱी गोमळवाडा येथ् डेरेदाखल झाले. त्याचबरोबर घरोघरी जाऊन लसिकरणाचे महत्व पटवून दिले. एवढ्यावरच न थांबता ग्रामीण भागत शेतकरी न्याहरी नंतर शेतातच मिळून येतात.

सद्यस्थितीत रब्बीसह तीन माहि उन्हाळी पिकांची मशागत सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूर कामासाठी शेतात गेल्याचे पाहून आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपली मोहीम थेट शेताच्या बांधावर वळविली. दरम्यान, कोरोनाच्या चौथ्या व संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी सर्व नागरीकांचे लसीकरण होण्याची अत्यंत आवश्यकता आहे.  त्यामुळे नागरीकांनी लसीकरणासाठी पुढे येऊन आरोग्यविभागाला सहकार्य करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.