लाच स्विकारताना पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

आडस पोलिस चौकीतील घटना, आरोपीच्या मदतीसाठी मागीतली दहा हजार रूपयांची लाच

0

केज, रयतसाक्षी : एका गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी आडस ता. केज चौकीतील पोलीस कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केली. ठरलेली दहा हजार रूपये रक्कम स्विकारताना बीड एसीबी पथकाने पोलीस चौकीत रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी दि. २२ घडली आहे.

 

धारूर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या आडस पोलीस चौकी हद्दीत दाखल गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी चौकीतील कार्यरत कर्मचाऱ्याने लाचेची मागण् केली. तडजोड करून दहा हजार रूपये देण्याचे ठरले. सदरील व्यक्तीची लाच देण्यासाठी इच्छा नसल्याने त्यांने बीड एसीबी कडे तक्रार केली.

 

त्यावरून बीड एसीबीने आडस येथे सापळा लावला पोलिस चौकी मध्ये दहा हजार रूपये स्विकारताना पोलस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले. तेजस ओव्हाळ असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून एसीबीच्या या कारवाईमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.