इंधन दरवाढी भडका कायम !

सलग दूसऱ्या दिवशीही ८५ पैशाने वाढले पेट्रोल,डिझेल

0

रयतसाक्षी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच आता नियमितपणे इंधन दरवाढ सुरू झाल्याचे दिसत आहे. तेल कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. कालच देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८५पैशांनी वाढ झाली असून येथे पेट्रोलचा दर १११.६७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर९५.८५ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. देशातील सर्व महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किंमती सर्वाधिक आहेत. दरम्यान, कालच घरगुतीत गॅस सिलिंडरच्या दरातही ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलची किंमत ८० पैशांनी वाढवण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल ९७.०१ रुपये आणि डिझेल ८८.२७ रुपये प्रति लिटर झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात ७५ पैशांनी तर डिझेलच्या दरात ७६ पैशांनी वाढ झाली आहे. आता येथे पेट्रोल १०२.९१ रुपये आणि डिझेल ९२.९५ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. कोलकात्यात ८३पैशांच्या वाढीसह पेट्रोल १०६.३४ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. त्याचवेळी डिझेल ८० पैशांच्या वाढीसह ९१.४२ प्रतिलिटर मिळत आहे.

महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांतील पेट्रोलचे दर (प्रति लिटर रुपयांमध्ये)

शहर आजचे दर कालचे दर
मुंबई 111.67 110.82
पुणे 112.14 110.67
नाशिक 112.15 111.24
औरंगाबाद 113.32 112.55
अहमदनगर 111.75 111.06
अकोला 112.03 111.12
नागपूर 111.39 111.03
कोल्हापूर 111.33 111.37

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.