वृद्धांच्या अनुभवाने समाजवास्तव कळाले

आजोळ परिवारामध्ये कालिंका देवी महाविद्यालयाचे रासेयो शिबीर

0

शिरूर कासार,रयतसाक्षी, तालुक्यातील राक्षसभुवन तांबा येथे कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर सुरू आहे. शिबीरातील स्वयंसेवकांनी आजोळ परिवार वृद्धाश्रमामध्ये श्रमदान केले. प्रसंगी वृद्धश्रमातील निराधार वृद्धांशी हितगुज साधत त्यांच्या विविध अंगी कैफियत ऐकून सामाज व्यवस्थेतील वास्तवाजी जनीव झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.

आजोळ परिवार वृध्दाश्रमामध्ये आयोजीत कालिंकादेवी कला , वानिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या शिबीरामध्ये स्वयंसेवकांनी येथ्ल निराधार वृद्धांची सेवा जाणून घेत त्यांच्याशी हितगूज साधले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

 

स्वयंसेवक बळीराम खेडकर हा विद्यार्थी म्हणाला की, लहान मूल जन्मल्यापासून आई- वडील त्यांची डोळ्यात तेल घालून काळजी घेतात परंतु ज्यावेळी या वृद्धांची काळजी घेण्याची गरज असते तेव्हा ही मुले आपल्या आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून निराधार करत असल्याची खंत त्याने यावेळी व्यक्त केली. गणेश गर्कळ म्हणाला की, आपले आई-वडील जर स्वतःला सांभाळता येत नसतील तर त्या मुलांना समाजात राहण्याचा काहीही हक्क नाही.

आई-वडील मुलाला हाताला धरून चालवयाला शिकवतात, परंतु म्हातारपणी हीच मुले त्यांना वृद्धाश्रमात वृद्ध आई-वडिलांना टाकून त्यांची हेळसांड करतात, आणि माय-बाप आणि मूल या नावाला ही नवीन पिढी काळीमा फासतात असल्याचा घणाघातही त्यानी केला.

 

तुकाराम घुले म्हणाले की, आई-वडिलांना मुलांनी घरीच सांभाळले पाहिजे त्यांची परिस्थिती कशीही असो परंतु आई वडील कधीही हट्ट करत नाहीत. त्यामुळे अशा आई-वडिलांना घरीच सांभाळणे ही संस्कृती आहे आणि ती जतन करणे हे मानवाचे कर्तव्य आहे. कुमारी उर्मिला आघाव ही विद्यार्थिनी बोलताना म्हणाले की,आई-वडिलांना ज्या पद्धतीने आपण देव मानतो त्याच पद्धतीने सासु-सासर्‍यांना ही देव मानले पाहिजे ही नव्या मुलीवर जबाबदारी असल्याचे सांगून तीने नव्या पिढीला संदेश दिला.

 

कुमारी सायली कुलकर्णी, दिपाली मिसाळ या विद्यार्थीनींनी आई वडीला प्रमाणे सासू-सासर्‍यांना ही सांभाळणे हे प्रत्येक मुलीचे कर्तव्य असून मुलींनीच वृद्धांच्या सेवेचा वसा चालवण्याची गरज असून असे झाल्यास वृद्ध् निराधार होणारच नाहीत, तरच समाजव्यवस्थेत ही क्रांती घडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वंयसेवक शितल खेडकर ,ऋतुजा जगदाळे, वैष्णवी खोले,विशाल तांबे, बबन नेटके,दादा तांबे,भारतभुषण तांबे, महेंद्र कदम आदींसह स्वयंसेवक विद्यार्थी-विदयार्थीनी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.