एकात्मतेच्या मंद सुगंधाने आसमंत दरवळला…!

सर्वधर्मसमभावाचे प्रतीक अति दुर्मिळ वायवर्ण वृक्ष बहरला; सर्पराज्ञी करणार " प्रार्थनास्थळ तेथे वायवर्ण " रोपण

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: पूर्वी सर्व धर्माच्या प्रार्थनास्थळाजवळ आवर्जून लावला गेलेला, धार्मिक पवित्र वृक्ष सर्वत्र परिचित सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळख असलेला अति दुर्मिळ वृक्ष वायवर्ण बीड जिल्ह्यामध्ये बहरला आहे. त्याच्या एकात्मतेच्या मंद सुगंधाने सारे आसमंत दरवळून निघाल्याने जणू निसर्गालाच सर्पराज्ञी, ची  भूरळ पडली असावी असे विहंगम दृष्य निसर्गप्रेमींना पहावयास मिळत आहे.

 

सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओळख असलेला अति दुर्मिळ वृक्ष वायवर्ण. पूर्वी हिंदूंच्या मंदिरा जवळ, मुस्लिमांच्या मज्जित, कबरस्ताना जवळ, बौद्धांच्या विहाराजवळ हमखास लावला जात असे. पूर्वी सर्वांना परिचित असलेला हा वृक्ष दिवसेंदिवस अपरिचित होत दुर्मिळ अति दुर्मिळ झाला आहे. बीड जिल्ह्यामध्ये या अतिदुर्मिळ वृक्षाचे दोन ठिकाणी अस्तित्व दिसून आले आहे .

शिरूर कासार तालुक्‍यात एका ठिकाणी तर अंबाजोगाई तालुक्यात एका ठिकाणी वनस्पती अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे व कमलेश पडझडिया या यांना ते दिसून आले आहे. तसेच या दोन्ही ठिकाणी वनस्पती अभ्यासक मिलिंद गिरधारी (औरंगाबाद) व शिवशंकर चापुले (लातूर) यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे.

 

वायवर्ण वृक्षास वरूण, वायवर्णा,   अश्या वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. याचे इंग्रजी नाव (three leaved caper )असून शास्त्रीय नाव (crataeva nurvala) आहे. हा एक पानझडी मध्यम आकाराचा लहान वृक्षआहे.  नदी, नाले, ओढ्याच्या कडेला नैसर्गिकरीत्या उगलेला दिसून येतो. बराच काळ निष्पर्ण राहिल्यानंतर  मार्च-एप्रिल मध्ये भरगच्च फुलांच्या गूच्यांनी बहरुन जात. फुलाच्या चार पाकळ्या वेगवेगळे असतात.फुंकेसर  १०ते २०लांब तांबूस किंवा जांभळट असतात. याची फळे पक्षी,वानरे माकडे, खारुताई ना खूप आवडतात.वायवर्ण आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून वेगवेगळ्याऔषधांमध्ये याच्या पांचागाचा वापर केला जातो.

 

    ” पूर्वी सर्व धर्माच्या प्रार्थना स्थळाजवळ हमखास लावला जाणारा सर्वांना परिचित असलेला हा वृक्ष दिवसेंदिवस अपरिचित होत होत अति दुर्मिळ झाला आहे .या वृक्षाला नवसंजीवनी देण्याचे कार्य सर्पराज्ञी च्या माध्यमातून आम्ही गेल्या दोन वर्षापासून करत आहोत.त्याची रोपे तयार करून ते रोपे निसर्गप्रेमींना मोफत देत आहोत. याहीवर्षी बीड जिह्यातील सर्व धर्माच्या प्रार्थनास्थळावर जवळ हा वृक्ष सर्पराज्ञीच्या माध्यमातून ” प्रार्थनास्थळ तेथे वायवर्ण “च्या माध्यमातून रोपण केले जाणार आहे.”

सिद्धार्थ सोनवणे

(सर्पराज्ञी संचालक तथा वनस्पती अभ्यासक)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.