तिसऱ्या मजल्यावरून फेकल्याने नवविवाहीतेचा मृत्यू

सारच्या मंडळी विरोधात गुन्हा, पतीस अटक

0

बीड, रयतसाक्षी : अवघ्या सहा महिन्यांपूर्वी सुखी संसाराची स्वप्न उराशी बाळगून सासरी पाठवलेल्या आपल्या लेकीचा तिसऱ्या मजल्यावरून फेकून देत खून केल्याच्या घटनेवरून बापालाच नव्हे तर शहर वासीयांना देखील धक्का बसला आहे. बीड शहरातील शाहू नगर भागात यास्मिन शेख हिच्या मृत्युनंतर पतीसह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

 

शहरातील इस्लामपुरा भागात राहणारे रहीम शरिफोद्दिन शेख यांची मुलगी यास्मिन शेख हिचा विवाह २६ ऑक्टोबर २०२१रोजी तिचा विवाह शकूर बशीर शेख (२९) याच्याशी लावला होता. शकूर हा मिस्त्रकाम करतो. लग्न होऊन एक महिना उलटल्यानंतर यासमीनला सासरी जाच होण्यास सुरुवात झाली.

 

गुरुवारी म्हणजे दि २४ रोजी सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. त्यावरून ते तत्काळ तिच्या घरी पोहोचले. यासमीनला तिसऱ्या मजल्यावरून फेकून संपविल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून पती शकूर बशीर बेग, दीर शेख नसीर बशीर, जाऊ सोफेया नसीर शेख विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.