परळी पोलिसांनी पकडला चंदणचोर पुष्पा

तळेगाव शिवारात पोलिसांची कारवाई

0

बीड -परळी, रयतसाक्षी :  परळी ग्रामीणचे ठाणेप्रमुख मारोती मुंडे यांनी गुप्त माहितीच्या आधारे तळेगाव शिवारात छापा मारून एका चंदनचोरास रंगेहाथ पकडले . यावेळी त्याच्याकडून १२ किलो चंदन आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला . ही कारवाई बुधवारी ( दि . २३ ) सायंकाळी करण्यात आली . चंदन तस्करीवर आधारित ‘ पुष्पा ‘ चित्रपट सध्या चर्चेत आहे .

चित्रपटात दाखविल्याप्रमाणे असे छोटे – मोठे ‘ पुष्पा ‘ बीड जिल्ह्यातही कार्यरत असल्याची प्रचीती बुधवारी आली . पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , बुधवारी सायंकाळी परळी ग्रामीण पोलिसांची हद्दीत गस्त सुरु होती . यावेळी तळेगाव शिवारात एक चंदनचोर शेतकऱ्यांच्या शेतातील चंदनाचे झाडे तोडून त्याचा गाभा पोत्यात भरुन तस्करी करण्यासाठी नेत असल्याची गुप्त माहिती सहा . पोलीस निरिक्षक मारोती मुंडे यांना मिळाली

मुंडे यांनी तातडीने पथक तयार करून तळेगाव शिवारात धाव घेतली आणि सायंकाळी ६.१५ वाजता छापा मारला असता कालव्या लगतच्या एका शेतात पप्पू बाबुराव सुर्यवंशी ( रा . अशोकनगर , परळी ) हा चंदनचोर चंदनाच्या झाडाचे खोड तासून गाभा काढत असताना आढळून आला .

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली आणि त्याच्याकडून अंदाजे ३० हजार रुपयांचे चंदन , तराजू , वजनमापे आणि पाच वाकस असा एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला . याप्रकरणी पो . ना . नामदेव चाटे यांच्या फिर्यादीवरून पप्पू सूर्यवंशी याच्यावर परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला . ही कारवाई अपर अधीक्षक कविता नेरकर , उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरिक्षक मारोती मुंडे , पोलीस कर्मचारी घुगे , नामदेव चाटे , अन्नमवार यांनी पार पाडली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.