महागाईचा आगडोंब , सर्वसामान्यांन मेटाकुटीला

0

माजलगाव, वेदांत गोपाळ : सर्वसामान्यांसाठी वाढती महागाई हे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. खाद्यपदार्थांच्या वस्तूंपासून इंधन, स्वयंपाकाचा गॅस याच्या किंमती सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून बाकी कुछ बचा तो महंगाई मार गयी.. महंगाई मार गयी…’ हे ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटातील गीत आजच्या महागाईला तंतोतंत लागू होत असल्याचे चित्र आहे. पालेभाज्यांसह धान्य, डाळी, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

 

गॅस हा स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक. पण, कोरोना रुग्णवाढीच्या आलेखाप्रमाणे घरगुती गॅसचे दरही वाढत गेल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. निवडणुका पार पडताच गैस ५० रुपयांनी महागला असून दर ९७५.५० रुपयांवर पोहोचले आहेत.

उज्ज्वला गैस योजनेमुळे शहरांसोबतच ग्रामीण भागातही सिलिंडरची मागणी वाढली आहे. मात्र, ग्राहकांना अर्थसंकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून सातत्याने दरवाढ होत असल्याने सिलिंडर लवकरच हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

त्यामुळे गृहिणीचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
पेट्रोल, डिझेलचे दर हे महागाई वाढण्याला कारणीभूत ठरत असून गतवर्षीच्या तुलनेत महागाईचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या आवाक्याबाहेर चालल्या आहेत. घाऊक बाजारात महागाईचा आलेख वाढत चालला आहे. घरगुती गॅस सिलिंडर ९७५.५० रुपये, पेट्रोल ११८.१९ प्रतिलिटर आता डिझेलनेही शंभरी ओलांडली आहे. गहू, तांदूळ, भाज्या, कांदे-बटाटे यांच्या किमतीत वाढ होत चालली असून या महागाईचा गरीब, सामान्यांना सर्वाधिक फटका बसत आहे त्यामुळे सामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

चुल पेटविता येईना, गॅस परवडेना:-
गॅस कितीही महाग झाला असला, तरी तो खरेदी करण्यावाचून पर्याय नाही. अनेकांची घर लहान असल्यामुळे चूल मांडता येईना. चूल मांडण्यासारखी स्थिती असली तर जाळण्यासाठी लाकडे मिळेनात. अशी अवस्था झाली आहे. मोलमजुरी करून संसार चालविनाऱ्यांचे यामुळे मोठे हाल झाले आहेत.
वाढत्या महागाईमुळे घरखर्च भागविणे खुप कठीण झाले आहे. इंधन दरवाढीमुळे आधीच जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यात गॅस महागल्याने खायचे काय, हा प्रश्न सर्वांसमोर आहे.
केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामान्याची चिंता नाही हे यावरून दिसून येते. इंधनावर अधिकभार लावून शासन आपले उत्पन्न वाढवू पाहत आहे. पण, यामुळे गरिबांच्या खिशाला भगदाड पडत आहे. याकडे त्यांनी पुरते दुर्लक्ष केले आहे. महागाई आवाक्यात न आल्यास पुढील काळात हातावर पोट असणाऱ्यांना आत्महत्या करण्यावाचून पर्याय नाही,
– नीता मुंदडा – गृहिणी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.