तालुक्यात श्री स्वामी समर्थ जयंती उत्साहात

0

माजलगाव, रयतसाक्षी : श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित), केंद्रामध्ये विविध ठिकाणी दत्त स्वरुप श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शाहू नगर माजलगाव तसेच ग्रामअभियानांतर्गत तालुक्यात उमरी पारगाव, सादोळा, पुरुषोत्तमपुरी, केसापुरी, नाथरा, तालखेड, नित्रुड, ढोरगाव, गंगामसला, मनूर देवीचे, घळाटवाडी, दिग्रस, पोहनेर येथे साप्ताहिक केंद्रामध्ये सर्व भाविकांनी, सेवेकऱ्यांनी आपापल्या घरी तयार केलेला नैवेद्य एकत्र करुन सकाळी १०:३० वाजता श्री स्वामी समर्थ जयंती उत्सवाची महाआरती घेऊन नंतर श्री स्वामी चरित्र सारामृत चे सामुहिक पारायणे चे (वाचन) करण्यात आले नंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी सर्वच केंद्रात भाविक सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक ठिकाणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी दरबार येथून देशातील हजारों केंद्राच्या माध्यमातून सामाजिक, अध्यात्मिक उपक्रम घेतले जातात, तसेच सदगुरु मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल हॉस्पिटल उभारून समाजातील विविध घटकांपर्यंत आरोग्याची सेवा देण्याच्या योजनेचा एक भाग म्हणजे जनकल्याण योजना, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचे महत्व सर्व ठिकाणी सांगण्यात आले. तसेच ८० टक्के सामाजिक उपक्रम व २० टक्के अध्यात्म या सुत्राने श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग काम करत आहे व ग्राम अभियानांच्या माध्यमातून ग्रामीण भागात व नागरी अभियानातून शहरी भागात मोठ्या प्रमाणात काम चालू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.