गॅस दरवाढीने कंबरडे मोडले, दरवाढीचा गॅस नकोच!

0

माजलगाव, वेदांत गोपाळ: शासनाने शंभर रुपयात सिलिंडर देऊन चुलीमधून निघणाऱ्या धुरापासून आमची सुटका केली; पण आता गॅसचा भाव वाढून सरकारने शंभर रुपयांत दिलेल्या गॅसची कसर काढून घेतली. रोजंदारी करून गॅस भरणे आता परवडत नाही. त्यामुळे चुलीवरचा धूर परवडला; पण गॅसची टाकी नको, हे शब्द आहेत ग्रामीण भागातील मजुरी करणाऱ्या महिलांचे कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. त्यात आस्मानी संकटांमुळे शेती व्यवसायाही अडचणीत आला आहे.

एकूणच शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णत: विस्कळीत झाली आहे. एकीकडे समोर आर्थिक अडचणी असताना दुसरीकडे महागाईचा भस्मासूर वाढत आहे. इंधन आणि घरगुती गॅसच्या दरात झालेल्या भाववाढीमुळे ग्रामीण भागातील महिलांवर आर्थिक ताण आला असून, मजुरी करून गॅस टाकी भरायला त्यांना जड जात आहे. काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील ९० टक्के कुटुंबे जळाऊ लाकडाच्या माध्यमातून चुलीवरच स्वयंपाक करायची; परंतु उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र शासनाने शंभर रुपयांत सबसिडीवर गॅस उपलब्ध करून दिला. त्यामुळे आता ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहे.

मात्र,स्वयंपाकाच्या गॅसचा दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच आर्थिक ‘बजेट’ कोलमडत आहे. सुरुवातीला गॅसवर सबसिडी मिळायची. दरवाढ झाल्यानंतर आता सबसिडी मिळत नसल्याचे चित्र आहे.

बदलून जात आहे. महिन्याचे आर्थिक गणित पूर्णतः विस्कळीत होत आहे. ही बाब पाहता गॅसचे दर कमी व्हावेत, अशी मागणी आता ग्रामीण भागातील महिलांसह सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणीही आता होवू लागली आहे.

दहा वर्षांत बदलले दर
सन २०१३-१४ – १०३८ ते १२७३
सन२०१७-१८ – ५८८ ते ७८०
सन २०१९-२० – ६६० ते ६९४
सन २०२१-२२ – ६९४ ते ९७५

सात वर्षात भाव झाले डबल
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसचे वितरण केले. मात्र, गत काही महिन्यांत गॅसचा भाव गगनाला भिडल्याने, तसेच सबसीडीही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला योजनेचे लाभार्थी व इतर गॅसधारक स्वयंपाकासाठी पुन्हा चुलीकडे वळले आहेत. गेल्या सात वर्षात ४१० रुपयांवरून घरगुती गॅसचा दर ९४९ रुपयांवर पोहोचला आहे.

२०० रुपयांत गॅस देऊन गॅसचा भाव वाढवून दिला. पहिले चुलीचा धूर डोळ्यातून पाणी काढायचा. शासनाने दिलेला गॅसही तेच करू लागला आहे.रोजंदारी करून सर्वसामान्यांना गॅस परवडत नाही. त्यापेक्षा फुकटात मिळालेलं सरपण आणून चूल पेटवणे सोपे आहे. त्याच्यासाठी पैसे लागत नाहीत,
– संस्तृप्ती जाधव

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.