माजलगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या प्रभारी पदी आयपीएस रश्मिता राव.

0

माजलगाव, रयतसाक्षी: पोलिसांची जनमानसातील प्रतिमा अधिक उंचावण्याकडे प्राधान्याने लक्ष देणार,, सर्वसामान्य लोकांमध्ये पोलिसांविषयी सकारात्मकतेची भावना निर्माण करणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखून कायद्याचा जे कोणी अनादर करतील त्यांची गय केली जाणार नाही.

त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारत माफियांचे कंबरडे मोडणार आहे. तसेच गुंडगिरीचा बिमोड करणार असल्याचे माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या नूतन प्रभारी आयपीएस रश्मिता राव यांनी सांगितले.

आयपीएस रश्मिता राव यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून रयतसाक्षीशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. चोरी, घरफोडी, मारामारी यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. यापूर्वी झालेले गुन्हे उघडकीस आणून संबंधित आरोपींना गुन्ह्यात शिक्षा कशी लागेल अशा प्रकारचा तपास करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले, मुली, महिला यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणार असून, यासाठी शाळा व कॉलेजवर जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.