विश्वरत्न, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पद्मश्री शब्बीर सय्यद हस्ते प्रतिमापुजन, उपासक- उपासिकांची उपस्थिती

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : विश्वरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती दिनी गुरूवारी (दि१४ )भारतीय बौध्द महासभा शाखा शिरूरच्या वतिने शोभायात्रा काढून बुद्धविहारामध्ये अभिवादन करण्यात आले . प्रसंगी पद्मश्री शब्बिर सय्यद यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले .

भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने गुरूवार दि. १४ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर येथून पोलीस निरिक्षक सिध्दार्थ माने यांच्या अध्यक्षतेखालील शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला . इंदिरानगर , संभाजी चौक ,सोनार पेठ ,सुतारनेट मार्गे बुध्दविहार मार्गे बुद्धविहार येथे पोचली. यावेळी पद्मश्री शब्बीर सय्यद यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले . नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवाजी पालेपाड ,प्रथम नगराध्यक्ष रोहिदास पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्र्वास नागरगोजे ,सामाजसेवक आदिनाथ गवळी , डॉ ‌.रमणलाल बडजाते ,रामनाथ कांबळे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले .
महामानवाला अभिवादन करण्यासाठी नगरसेविका मोहिनी भालेराव ,अमृता चव्हान ,अमोल चव्हाण ,युवराज सोनवणे ,दिलीप माने ,मनोहर औसरमल ,बंडू सोनवणे ,छत्रपती नन्नवरे आदिंसह सर्व नगरसेवक ,उपासक उपासिका मोठ्या संखेने उपस्थित होते .
सुत्रसंचलन भारतीय बौध्द महासभेचे बौध्दाचार्य बाळासाहेब बोराडे यांनी केले तर आभार अरूण भालेराव यांनी मानले

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.