नागरिकांच्या आरोग्यासाठी निधी कमी पडू देणार नाही- ना. भारती पवार

धाड येथे ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण व आरोग्य मेळावा संपन्न

0

रयतसाक्षी : बुलडाणा जिल्ह्याच्या आरोग्यासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच भविष्यात जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी धाड येथील ऑक्सीजन प्लांटच्या लोकार्पण आणि भव्य मोफत आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.

 

धाड (ता. जि. बुलडाणा)  येथे दि.२२ रोजी तोरणा महिला अर्बन बँक उद्घाटन , डॉक्टर फॉर यू या संस्थेच्या सौजन्याने सुरू करण्यात आलेल्या ऑक्सीजंन प्लांटचे लोकार्पण व आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार बोलत होत्या.

 

या वेळी माजी आमदार मा. विजयराज शिंदे, डॉक्टर फॉर यू संस्थेच्या डॉ. वैशाली रेणू, सर्वश्री देविदास पाटील, सुनील देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. तर योगेश राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले.डॉ. नितीन तडस जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. एम. एम. राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी, मा. डॉ. वैशाली वेणू संचालक डॉक्टर्स फॉर यु, श्रीरंग अण्णा एन्डोले जिल्हा कार्यकारिणी सदस्य, डॉ. सरपाते तालुका आरोग्य अधिकारी, संकेत  झा सचिव डॉक्टर्स फॉर यु, ॲड. सुनील देशमुख तालुका अध्यक्ष भाजप , दत्ता पाटील जिल्हा उपाध्यक्ष भाजप

डॉ. तेजराव नरवाडे, योगेश राजपूत तालुका अध्यक्ष युवा मोर्चा , सखाराम नारोटे जिल्हा कार्यकारिणी सदस्य , प्रा वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकारिणी सदस्य , प्रकाश पाटील पदोळ जिल्हा उपाध्यक्ष किसान आघाडी , संदीप उगले , जितेंद्र जैन तालुका सरचिटणीस भाजप, किरण सरोदे तालुका कोषाध्यक्ष भाजप , गणेश राव साखरे, सरपंच सौ  सत्यभामा बोर्डे , टीका खान , सोहेल खान , अरुण पाटील, पुरुषोत्तम भोंडे , मंगेश जाधव , अनिल जाधव , जयेश पटेल, विष्णू वाघ, संदीप उगले , गजानन जाधव , निलेश धंदर, विशाल मोहिते, विशाल विसपुते, गोपाल तायडे,  जितेंद्र तायडे , बबन सुसर ,भगवान पिंपळे, सतीश पाटील, देवेंद्र पायगन , अर्जुन लांडे, शरद देशमुख, समाधान आघाव , कल्याणराव कानडजे , कैलास उबाळे , रमेश ताठे , प्रमोद वाघ, राजू  चांदा , गजानन देशमुख, सारंगधर वाघ, समाधान मुरकुटे यांच्यासह आशा सेविका , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.