खोल विहिरीत पडलेल्या काळविटाच्या पाडसास जीवदान

आर्वी शिवारातील घटना, सेवानिवृत्त सैनिकाच्या मदतीने सर्पराज्ञी केंद्रासह वनविभागाचे परिश्रम

0

रयतसाक्षी: आर्वी येथील धर्मराज सानप यांच्या शेतातील पाच- परस खोल विहिरीत पडलेल्या  ७ ते ८ महिन्याच्या काळविटाच्या पाडसास विहिरीतून बाहेर काढण्यास सेवानिवृत्त  फौंजिच्या मदतीने वनविभाग व सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रास यश मिळाले. त्यानंतर त्यास तात्काळ सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांच्या हस्ते काळविटाच्या कळपाशेजारी  मुक्त करण्यात आले.

 

सानप यांना त्यांच्या शेतातील विहिरीत काळवीट पडल्याचे  आज सकाळी मंगळवारी (दि.२६)  निदर्शनास आल्यावर त्यांनी वनरक्षक बद्रीनाथ परजने व शिवाजी आघाव  यांना माहिती दिली. त्यानंतर विभागीय वन अधिकारी सचिन कंद, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे व वनपाल साधू धसे  यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे, वनरक्षक बद्रीनाथ परजने, शिवाजी आघाव, गणेश मोरे व सुनील आघाव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर आर्वी येथील सेवानिवृत्त फौजी भागवत खेडकर, दादासाहेब जोगदंड,राम सानप, सुभाष सानप ,प्रमोद सानप ,सुर्यकांत नागरगोजे, कैलास खेडकर, बाळासाहेब सानप, राम सानप यांच्या मदतीने त्या काळविटाच्या पाडसास  विहिरीच्या बाहेर दोरखंडाच्या साह्याने काढले. त्यानंतर त्यास तात्काळ जवळच असलेल्या त्यांच्या कळपा जवळ सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांच्या हस्ते सोडून देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.