आधी महागाईचा भोंग्या उतरावा

अनावश्यक प्रश्न पेटवून काही साध्य होणार नाही अशी सामान्यांची भावना आता झालली आहे.

0

वेदांत गोपाळ, माजलगाव : सातत्याने सुरू असलेली पेट्रोल-डिझेल दरवाढ, त्यामुळे वाढलेला वाहतूकखर्च आणि रशिया युक्रेन युद्धाचा काही जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर झालेला परिणाम या तीन प्रमुख कारणांमुळे महागाईचा वणवा पेटला आहे. मात्र या मुद्यांकडे लक्ष देण्याऐवजी अनावश्यक प्रश्न पेटवून काही साध्य होणार नाही अशी सामान्यांची भावना आता झालली आहे.

भाज्या, अन्नधान्य, खाद्यतेल, बांधकाम साहित्य अशा सर्वच अत्यावश्यक बाबींच्या दरांमध्ये वाढ झाली असून महागाईच्या झळा असह्य पातळीवर पोहोचल्या आहेत. परंतु देशासह राज्यात सध्या मशिदींवरील राजकारण पेटलेले आहे. या भोंग्यांच्या आवाजापेक्षा सामान्य जनतेला माफक दरात जीवनावश्यक वस्तू आवश्यक असताना, वाढलेल्या महागाईचा आक्रोश सरकारने ऐकावा. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ईदनंतर मशिदीवरील भोंगे काढले नाही, तर देशभरातील मशिदींसमोर भोंग्यावरुन हनुमान चालिसा म्हणणार, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. खरं तर वाढत्या बसलेल्या लोकप्रतिनिधींना भोंग्यातून माहिती देत

महागाईबाबत शासनात गोरगरिबांचे होणारे हाल
सांगणे गरजेचे आहे. एकीकडे सामान्य कुटूंब महागाईने होरपळत असून शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव शेतीची मशागत महागत नाही, डीझेल दराच्या वाढीने आहे. सामान्यांच्या भाजीत तेलाऐवजी पाणी घालण्याची वेळ आली आहे. सामान्यांच्या जीवनावश्यक बाबींकडे दुर्लक्ष होऊन महागाईच्या बांबाट्यापेक्षा भोंग्याचा आवाज वरचढ ठरत आहे. भोंगा वाजवायचा असेल तर महागाई, बेरोजगारी, गरीबी विरोधात वाजवा अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.