आष्टी, पाटोदा,शिरुर नगरपंचायतीच्या प्रत्येकी सतरा जागेसाठी एवढे अर्ज

मा. उच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणास स्थगिती निर्णयामुळे आरक्षीत प्रभागाच्या इच्छुकांच्या हिरमोड झाला.

0

रयतसाक्षी : जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकांठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मंगळवार (दि. ७) ची अंतिम मुदत असल्याने तहसिल कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. त्याच मा. उच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणास स्थगिती निर्णयामुळे आरक्षीत प्रभागाच्या इच्छुकांच्या हिरमोड झाला होता .

त्यातच राज्य निवडणूक आयोगाने दुपारी ओबीसीसाठी राखीव जागेवरील उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करुन घेण्यास प्रतिबंधाचे पत्र जारी केल्याने दुपारीच राखीव जागेवरील अर्ज स्वीकारण्यास मनाई करण्यात आली . मात्र तो पर्यंत काही इच्छुकांनी अर्ज सादर केले होते.

प्राप्त माहिती नुसार आष्टी नगरपंचायत निवडणूक च्या १७ जागेसाठी ओबीसी साठी प्रभाग क्रमांक ३,४,६,११ राखीव प्रभाग वगळून एकून १३ प्रभागात दिवसभरात ११४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर दुपार पर्यंत ओबीसी साठी राखीव प्रभागात एकून १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.एकून 172 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची नगरपंचायत माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी विनोद गुंड्डमवार यांनी दिली.
पाटोदा नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी एकून १७ प्रभागासाठी २११ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ओबीसीसाठी राखीव प्रभागातील उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास स्थगिती देण्यात आली मात्र आदेश जारी होईपर्य़त १७ जागांसाठी २११ अर्ज दाखल करण्यात आले होते.

शिरुर कासार नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी एकून १७ प्रभागा पैकी १३ प्रभागासाठी १२१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ओबीसीसाठी राखीव प्रभाग क्रमांक १,२,९,११मध्ये एकून १२ उमेदवारी अर्ज‌दाखल करण्यात आले होते. मात्र आयोगाच्या आदेशा नुसार दुपार नंतर ओबीसीसाठी राखीव प्रभागातील अर्ज स्वीकारण्यास स्थगिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.