हिंदुस्थानाला लाभलेला एक चारीत्रसंपन्न राजा- छत्रपती संभाजी महाराज

शाक्तवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती विशेष

0

या देशात अनेक राजे-महाराजे होऊन गेले,पण उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम या चारही दिशांनी ऐकायला मिळाल्या ते महिलांवरील अन्याय आणि अत्याचारांच्या किंकाळ्याच. रयतेचं शोषण आणि स्वतःचं भुषण सांगणाऱ्या अनेक शाह्या त्यात मुघलशाही,अदिलशाही, कुतुबशाही याबरोबरच डच, इंग्रज आणि पोर्तुगीज ही मागे राहीले नाहीत.अशा जुलमी राजवटीत त्या पातशाह्या पालथ्या घालुन स्वराज्याचं रणशिंग फुंकणारे सर्वगुणसंपन्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवणाऱ्या चारित्र्यवान,शौर्यविर, महापराक्रमी पुत्राची पुन्हा एकदा गरज होती.

 

रयतेच्या डोळ्यातील अश्रु पुसुन शिवविचारांचा झेंडा तेवत ठेवण्याची.झोपलेले अनेक जागे केलेत शिवरायांनी पण जागं आहेत त्यांना चालण्याची आणि चालणाऱ्याना पळण्याची प्रेरणा देण्यासाठी गरज होती एका डोईवरील छत्राची. आणि जन्म झाला छत्रपती शंभूराजे चा. त्या रायगडाच्या पवित्र मातीत वावरणाऱ्या 18 पगड जातींना हजारो मावळ्यांना हत्तीचं बळ आलं पुन्हा स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर पेलून धरणारा छत्रपती जन्माला आला याचं सुख आणि समाधान अनेकांच्या चेहऱ्यावर झळाळू लागलं. पण काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी मात्र आमच्या धाकल्या धन्याला आयुष्यभर बदनाम करण्यातच धन्यता मानली.

 

 

छत्रपती। संभाजी महाराजांना नेहमी रगेल आणि रंगेल म्हणूनच तुम्हा आम्हा समोर आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला. कट कारस्थान रचल्या गेलं.पण जे छञपती संभाजी महाराज आईच्या उदरात असतानाच स्त्री वर झालेला अन्याय सहन करू शकत नव्हते,ते छ.संभाजी महाराज त्यांच्या हयात असताना काय सहन करणार…..?

 

छत्रपती शंभूराजे मातोश्री सईबाईच्या पोटात वाढत होते,आणि मातोश्री सईबाई ह्या शिवरळ या गावावरून येत असताना  वाटेत त्यांच्या निदर्शनास आले की एका स्त्री वर रानात अन्याय होत आहे. सईबाई तेथे पोहचल्या त्यांनी त्या मुघल सैनिकाशी दोन हात केले, आणि स्त्री कडे वाकडया नजरेने पाहणाऱ्याची स्वराज्यात गय केली जाणार नाही ध्यानात ठेवा….! अशी ताकिद देऊन निघाल्या.

 

रायगडावर पोचल्यावर दिवस भरलेले असताना गनिमाशी दोन हात करायची काय गरज होती ? असा प्रश्न जेव्हा त्यांना सोयराबाई साहेब व पुतळाबाई साहेब यांनी विचाला. त्यावेळी सईबाई साहेब म्हणतात, “आम्हाला काय झाले?का झाले? व कसे झाले …? हे  काहीच कळले नाही आम्ही भानच हरपून गेलो होतो!”

त्यावेळी माँसाहेब जिजाऊ म्हणतात,”सईबाई हे डोहाळे आहेत…आम्हाला ही शिवबांच्या वेळेस असेच डोहाळे लागले होते. तलवार उचलाविशी वाटत होती. परंतू तुमचे डोहाळे जरा जास्तच कडक आहेत तुम्ही तर थेट गनिमांशिच भिडलात !” जिजाऊ माँसाहेबाानंतर स्वराज्याचे,स्वराज्य रक्षणाचे जर डोहाळे कोणाला लागले असतील तर ते सईबाई राणी साहेबांना लागले.

 

अरे कसलं हे मातृत्व, अरे कसला हा पराक्रम, अरे कसलं हे शौर्य या भूतलावरील अनेक महिलांना गरोदरपणात डोहाळे लागतातच त्यात काही नवल नाही, पण या मातीसाठी तिळतीळ झटणाऱ्या,आणि मरमर मारणाऱ्या या छत्रपती घराण्यांचे डोहाळे सुद्धा रणांगणावर तलवार गाजवण्याचे लागणे म्हणजे जगातील एकमेव आणि अद्वैतीय उदाहरण असेल.

 

आईच्या उदरात असताना जर का एखाद्या स्त्री वर अन्याय होत असेल,आणि त्यांच्या मातोश्री ने त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जर तलवार उपसली असेल तरत्याच क्षणी आईच्या उदरात जे बाळ लाथ मारायचं ते बाळ म्हणजे संभाजी बाळराजे होत…!

छञपती शिवाजी महाराज आग्रा भेटीसाठी गेले, त्यावेळी ते जाताना  नऊ वर्षाच्या संभाजी महाराजांना। सोंबत घेऊन गेले परंतू औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवराय परत स्वराज्यात जात असताना शंभूराजांना सोबत घेऊन जानं हे त्यांच्यासाठी जोखमीचं होत.म्हणून त्यांनी मथुरेत बाळकष्ण कुलकर्णी यांच्या घरी शंभूराजाना ठेवल होतं. मुघलांच्या हद्दीत प्रत्येक क्षणा-क्षणाला संभाजीराजे यांना धोका होता.पण एक दिवस संभाजीराजे वेशांतर करून मथुरेत वावरत होते,संभाजीराजांसमोर एक मुघल सरदार एका स्त्री वर अन्याय करत होता,तिला मारहाण करत होता.

 

त्यावेळी संभाजीराजे तेथे पोहचले त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि त्यांच छञपतींच रक्त सळसळलं आणि शंभूराजे कडाडले, “स्त्री वर अन्याय करसाल तर गाठ आमच्याशी आहे.आया बहिनीवर हात टाकलेल्याची गय केली जाणार नाही लक्षात ठेवा “.

शञूच्या हद्दीत प्रत्येक क्षणाला मृत्यू समोर असताना सुध्दा,स्वता:च्या जिवाची पर्वा न करता अवघ्या नऊ वर्षाच्या संभाजी महाराजांनी स्त्री अन्यायविरूध्द आवाज उठवला.त्या चारित्र्य वाण राजाला इतिहासात चारित्र्य हीन राजा म्हणुन दाखवले यापेक्षा दुर्दैवं अजुन काय असु शकते..?

 

स्वराज्यातील कुठल्याच आई बहिनीचं कुंकू पुसल्या जाऊ नये म्हणून स्वराज्यांचे सुरणिस अनाजी पंत यांची मुलगी गोदावरी यांच्या पतीने र-वराज्य द्रोह करून सुध्दा केवळ गोदावरीचं कुंकू पुसल्या जाऊ नये म्हणून संभाजी राजेंनी गोदावरीचा पती केदारजी शहापुरकर यांना पहिल्यांदा माफी दिली.

 

परंतु  संभाजी महाराजांविषयी असलेल्या व्यक्तिगत द्वेषा पोटी काही लोकांनी गोदावरी वरून संभाजी महाराजांवर आरोप केले. परंतू संभाजी राजे यांनी गोदावरीस आपली बहिन राणू अक्का समान मानलं होतं,परंतू शंभूराजे द्वेषींनी आपल्या समोर ह्या गोष्टीचा इतिहास वेगळया प्रकारे मांडून संभाजीराजेंनाच बदनाम करण्यात आलं.

 

दोन वर्षाचे असताना आईचं छञ गेलं त्यानंतर माँसाहेब जिजाऊनी त्यांच्यावर संर-कार केले .माँसाहेबांच्या संर-कार शाळेत घडलेले संभाजी राजे रगेल आणि रंगेल कस काय असू शकतात ? याचा विचार आपण केला पाहिजे.

 

जिजाऊ माँसाहेबांनी शंभूराजेंवर संस्कार केले त्यांना युध्दनितीचे,गनिमीकाव्याचे,पराक्रमाचे, शौर्याचे धडे दिले. माँसाहेबाच्या छञाखाली मोठा झालेला शिवरायांचा छावा कदापी असं वागू शकत नाही.  याची इतिहास साक्षी देतो पण तो खरा असावा लागतो…! उदाहरण द्यायचंच झालं तर शृंगारपूरचा प्रसंग या ठिकाणी सांगावयास नक्कीच हवा.

 

स्वराज्याचे चिटणीस अनाजी पंत यांनी गैरव्यवहार केल्याच्या तक्रारीची प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी संभाजी महाराज राजाराम राजे यांना सोबत घेऊन शृंगारपुरी जातात .

 

परतीच्या वाटेला लागतात वाटेत एका बैलगाडीतून एक स्त्री शंभू राजे यांना “युवराज,युवराज मला वाचवा” म्हणून हाक मारते महाराज थांबतात त्या वेळी एक तमासगिरीन एका स्त्रीला तिला तिच्या मर्जी विरूध्द विकत घेऊन औरंगाबादला नेऊन विकल्या जात आहे. असं कळतं त्यावेळी संभाजी महाराज त्या तमासगिरींच्या मालकीणीस तिच्या वरील ताबा सोडा म्हणून सांगतात परंतू ,आपण तिला पंचविस होन देऊन विकत घेतल्याचं सांगुन तिच्यावर खर्च केलाय.

 

आता हिला नेऊन मुघलांना विकल्या शिवाय आमचं घर कसं चालणार गरिबाला परेशान करू नका युवराज.आमचा व्यवसाय आम्हांसणी करू द्या…..!त्यावेळी,संभाजी महाराज यांनी त्यांना पंचविस च्या बदल्यात पन्नास होन देऊन त्या बाईवरील ताबा सोडण्यास सांगतात.

 

स्वराज्याच्या युवराजांनी आपल्याला मुक्त करण्यासाठी ऐव्हढी मोठी रक्कम अदा केली हे पाहून ती बाई भारावून जाते आणि त्यांची उतराई जमेल तशी करेल अस संभाजी महाराजांना सांगते.त्यावेळी संभाजी महाराज म्हणतात, “ताई त्याची गरज नाही” ह्याची उतराई म्हणून ती महाराजांना गाणं ऐकण्याची विनंती करते .पण महाराज आपल्याला वेळ नाही व गाण ऐकण्याची आवडही नसल्याचं सांगून निघतात.ती माञ गाणं गाण्यास सुरूवात करते आणि म्हणते….

“उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जिवावर नाही कोणाची पर्वा,आम्ही जिजाऊच्या मुली जश्या तलवारीच्या आण्या, होईल तुझीच रे शोभा बोल दूरन शहाण्या,आम्ही जिजाऊच्या मुली मिरर्या परिस तिखट, बोल जपून रे बाबा ,आब जाईल फुकट,आम्ही जिजाऊच्या मुली जश्या तलवारीच्या धारा ,नाही घेणार बघ दादा कोण्या परायाचा वारा,उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा,जिजाऊच्या जिवावर नाही कोणाची पर्वा”

 

तिचे हे गाणे ऐकत असताना महाराज डोळे बंद करून माँसाहेब जिजाऊंच स्मरण करत असतात शेजारी राजारामराजे बसलेले असतात.पण महाराज रायगडावर येण्याआधि त्यांच्या बदनामीच्या हालचाली चालु झाल्या होत्या.बदनामी करून न थांबता शिवपुञांना,र-वराज्याच्या युवराजां सदरेवर उभे केल गेल.पण म्हणतात ना, “सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं|” अगदी तसच हया कठिण प्रसंगात संभाजी महारााजांवरचे बिनबुडाचे आरोप सत्य समजताच गळून पडले आणि स्वराज्याचे युवराज निष्कलंक,निर्मळ त्यातून बाहेर पडले.चारिञ्यसंपन्न राजा बदनामीच्या कटकास्थानात अडकवून चारिञ्यहिन म्हणून आपल्या समोर आणल गेल.

 

ऐव्हढा चारिञ्यसंपन्न अद्वितीय राजा हिंदूर-थानाच्या मातीला लाभला हे इथल्या मातीच भाग्य परंतू ह्याच मातीत आपण संभाजी महाराजां बदनाम होताना याची देही याची डोळा पाहिलय याचा अर्थ ह्या मातीतील रयत आता षंड झालीये की काय असा प्रश्न पडतोय ? पण ह्या राजाच महत्व आपल्या बलात्काराच्या घटना घडल्यावर कळत दिवसा ढवळया ह्याच हिंदूस्थानात हजारो बलात्कार अन्याय अत्याचार महिलावर होत असतात आणि आपणास आज ही छ.शिवाजी महाराज,छ.संभाजी महाराज हया मातीला लाभावे अस वाटतय तुम्हा आम्हा तरूणाच्या डोळयासमोर एक आदर्श ठेवून त्यांच्या विचारावर जर चाललो तर प्रत्येकांच्या घरात छ.शिवाजी महाराज,छ.संभाजी महाराज घडतील यात तिळ माञ शंका नाही.

ह्या हिंदूर-थानाच्या मातीच रक्षण कालही आपल्या वंशजानी केल आज ही आपण करू आणि येणारी पिढीपण ह्याच विचारावर ह्या मातीच रक्षण करेल ऐव्हढी अपेक्षा करते आणि छ.संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांना त्रिवार मानाचा मुजरा करून माझ्या शब्दरूपी आदरांजली ला पूर्णविराम देते !

जय जिजाऊ!

जय शिवराय!

जय शंभूराजे!

 

शब्दांकन :

सुचिता जोगदंड पाटिल-वडजे

नांदेड

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.