सर्पराज्ञीत श्री आनंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला शून्य सावली दिवस

राज्यात ३ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: कुतूहल निर्माण करणारा शून्य सावली दिवस १५मे रोजी सर्पराज्ञीत श्री आनंद कॉलेज पाथर्डी च्या विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या वेळी अनुभवला.
शुन्य सावली दिवस या दिवशी आपल्या सोबत वर्षभर सोबत असणारी आपली सावली काही मिनिटांसाठी आपल्याला सोडून जाते. मनात कुतूहल निर्माण करणाऱ्या हा दिवस महाराष्ट्रात ३मे ते ३१मे पर्यंत अनुभवता येणार आहे. आज दिनांक १५मे रोजी महाराष्ट्रातील बीड, मुंबई, नवी मुंबई, कर्जत, माथेरान, राळेगणसिद्धी, सीरोंचा या ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता आला.
बीड जिल्ह्यामध्ये सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र येथे पाथर्डी येथील श्री आनंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या वेळी दुपारी १२:०० ते १२:३५ या वेळेत प्राध्यापक सूर्यकांत काळोखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शून्य सावली दिवसची अनुभूती घेतली.

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या २३.५० अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी ह्यांतील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा तसेच सूर्य दररोज ०.५० अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते,महाराष्ट्रात ३ ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवसअनुभवता येणार आहे . महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळांत काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी १२.०० ते १२.३५ दरम्यान सूर्यनिरीक्षण करावे. समुहासाठी उपक्रम करायचा असेल, तर मोकळय़ा जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल, तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले, तरी चालेल,
३ मे – सावंतवाडी, शिरोडा, मांगेली, खूषगेवाडी*
४ मे – मालवण, आंबोली*
५ मे – देवगड, राधानगरी, रायचूर*
६ मे – कोल्हापूर, इचलकरंजी*
७ मे – रत्नागिरी, सांगली, मिरज*
८ मे – कऱ्हाड, जयगड, अफजलपूर*
९ मे – चिपळूण, अक्कलकोट*
१० मे – सातारा, पंढरपूर, सोलापूर*
११ मे – महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाई*
१२ मे – बारामती, बार्शी, उस्मानाबाद*
१३ मे – पुणे, मुळशी, दौड, लातूर, लवासा, असरल्ली*
१४ मे – लोणावळा, अलिबाग, दाभाडे, पिंपरी-चिंचवड, देहू, जामखेड, आंबेजोगाई*
१५ मे -मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड, माथेरान, राळेगण सिद्धी, सिरोंचा* येथे शुन्य सावली दिवस होऊन गेला. तर उद्या पासून महाराष्ट्रातील या वेगवेगळ्या ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे.
१६ मे – बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर, नारायणगाव, खोडद, अहमदनगर, परभणी, नांदेड*
१७ मे – नालासोपारा, विरार, आसनगाव, अहेरी, आल्लापल्ली*
१८ मे – पालघर, कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा*
१९ मे – औरंगाबाद, डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, जालना, पुसद, बल्लारशा, चामोर्शी*
२० मे – चंद्रपूर, मेहकर, वाशीम, वणी, मूल*
२१ मे – मनमाड, चिखली, गडचिरोली, सिंदेवाही, रोहना*
*२२ मे – मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी
२३ मे – खामगाव, अकोला, देसाईगंज, ब्रम्हपुरी, नागभीड
२४ मे – धुळे, जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड, दर्यापूर
२५ मे – जळगाव, भुसावळ, अमरावती, अंमळनेर, तेल्हारा
२६ मे – नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा
२७ मे – नंदुरबार, शिरपुर, बुऱ्हाणपूर, चिखलदरा, तुमसर, गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक
२८ मे – अक्कलकुआ, शहादा, पांढुरणा, वरुड, नरखेड
२९ मे – बोराड, नर्मदा नगर
३० मे – धाडगाव
३१ मे – तोरणमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.