प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव होऊन महिलेचा मृत्यू

माजलगाव शहरातील जाजू हॉस्पिटल मधील घटना; डॉक्टरांवर निष्काळजीपनाचा आरोप नातेवाईक संतप्त

0

रयतसाक्षी, वेदांत गोपाळ : शहरातील जाजू हॉस्पिटल मध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा व बाळाचा सोमवारी दि. १६ प्रसूती दरम्यान मृत्यू झाला.  डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ-बाळंतनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तनावाचे वातावरण निर्मान झाले होते. दरम्यान  पोलिस निरीक्षक यांच्या मध्यस्थीने नातेवाईकांनी मयत बाळ माताचे मृतदेह ताब्यात घेतले.

 

तालुक्यातील खेर्डा खू येथील सोनाली पवन गायकवाड व २२ वर्षे हि महिला प्रसूती उपचारासाठी शहरातील जाजू हॉस्पीटल मध्ये दाखल झाली होती. मागील वर्षीच या महिलेचा विवाह झाला होता. डॉ. उर्मिला विजयकुमार जाजू व विजयकुमार जाजू  यांच्या अधिपत्याखाली उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे उपचारा दरम्यान अधिक रक्तसत्राव होऊन सोनालीसह बाळाचा मृत्यू झाला. दरम्यान प्रसूतीवेदना होत असल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांना सिझर प्रसूती करण्याची विनंती केली, पण डॉक्टरांनी सोमवारी पहाटे साधारण प्रसूती केल्याचा आरोप मयत सोनालीच्या नातेवाईकांनी केला. दरम्यान, प्रसूती दरम्यान बाळाचे वजन जास्त प्रमाणात वाढले त्यातच सोनालीची प्रकृती बीगाडली.

 

गंभीर प्रकृतीमध्ये डॉक्टरांनी इतरत्र हलविण्याचा सल्ला दिला.  त्यानुसार शहरातील यशवंत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यासाठी प्रवासा दरम्यान सोनालीसह बाळाचा मृत्यू झाला. बाळासह मातेच्या मृत्यूस डॉक्टर जाजू जबाबदार असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह जाजू हॉस्पीटल समोर आणून ठेवले. संतप्त नातेवाईकांनी मयत सोनालीवर उपचार करणऱ्या दोन्ही डॉक्टरवर गुन्हा दाखल केल्या शिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने परिसरात मोठा जमाव झाला आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच माजलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांच्या भावना समजून घेत मध्यस्थीचा प्रयत्न केला.

 

मात्र, मागणीवर ठाम नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, पोलीसउपनिरीक्षक अविनाश राठोड यांनी संतप्त नातेवाईकांची समजूत काढली आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबाजोगाईच्या शासकिय रूग्नालयात पाठवले. घटनेचे गांभीर्य राखून माजलगाव पोलिसांनी नातेवाईकांना तपासअंती दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे अश्वासन दिले आहे. सायंकाळी उशीरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजलगाव शहरात अशा घटनांत वाढ  

प्रसूती उपचारासाठी दाखल होणाऱ्या बाळ- मातांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत आहे. काही वादग्रस्त हॉस्पीटलच्या डॉक्टरांचा गोरख धंदा सुरू असल्याने यास लगाम घालण्यासाठी कर्तबगार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी विशेष मोहिम राबविण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.