महागाई विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार !

शिरूरमध्ये जिजामाता चौकात धरणे, कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारचा निषेध

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: महागाई च्या भस्मासुराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पेट्रोल, डिझेल गॅसच्या दरवाढीने जीवनावश्यक साहित्याची दरवाढ आवाक्यात बाहेर झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. केंद्र सरकारच्या जूलमी धोरणा विरोधात राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष सागर गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. २१) जिजामाता चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

महागाईच्या आगडोंबाने देशभरातील जनता होरपळत आहे. केंद्र सरकारचे जूलमी धोरण नागरिकांच्या मुळावर उठल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूकीची एनर्जी पेट्रोल, डिझेल च्या दराने सव्वा शतक गाठल्याने जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती अकाशाकडे झेपावल्या आहेत . विकासाच्या नावाखाली देशभरातील मोजक्या शेठ-बनीयांच्या हितासाठी केंद्र सरकारने सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे.

स्वातंत्र्य काळातील विक्रमी महागाईच्या मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठी केंद्र सरकार बाष्कळ मुद्यांचे राजकारण करत आहे. जनतेवर जूलमी निर्णय‌ लादून उद्योगपतींच्या झोळ्या भरण्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक चे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष सागर गाडेकर यांच्या नेतृत्वाखालील शहरातील जिजामाता चौकात शनिवारी (दि.२१) धरणे आंदोलन करण्यात आले . दरम्यान, आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा धिक्कार असो, इंधन दर वाढ रद्द झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला .

 

तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी श्रीराम बेंडे यांच्या अधिपत्याखाली महसुलाचे नायब तहसिलदार बाळासाहेब खेडकर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले . यावेळी तालुकाध्यक्ष अविनाश सानप , सुभाष यमपुरे, कदीर शेख, सावता कातखडे, भिमराव गायकवाड, नशीर शेख, दिनेश गाडेकर, अमोल चव्हाण, सुनिल गाडेकर, बाळासाहेब काटे, अकाश गायके, शिवाय पावसे, सरफराज आतार, रोहन जोगदंड, प्रदिप सरवदे, प्रदिप काटे, गणेश मोरे, नितिन नन्नवरे आदींची उपस्थिती होती.

 

शहर राष्ट्रवादीला सागरा चे स्वरूप !
शिरूर शहरासह तालुक्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था भाजप च्या ताब्यात आहेत . सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादी समोर शसहरामध्ये सक्षम नेतृत्वाची आवश्यकता हरहुन्नरी, अभ्यासु, तज्ञ, सामान्यांची जान , मुलभूत प्रश्नांची चाड, लोकहितवादी, शहरातील तरुणांचा आवाज ॲड. सागर गाडेकर पाटील यांच्या रुपाने पूर्ण झाल्याचा अनुभव शिरूर करांना या आंदोलनातून आल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. ॲड. सागर गाडेकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील हे पहिलेच आंदोलन यशस्वी झाल्याने शहर राष्ट्रवादीला सागराचे स्वरुप मिळणार यात तसुभरही शंका नाही .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.