इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे एल्गार आंदोलन

चुलीवर स्वयंपाक करून नोंदविला निषेध

0

नांदेड, रयतसाक्षी: पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या केंद्रातील चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, गॅस, डिझल या इंधनाच्या वस्तूच्या किमती प्रचंड वाढवल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. भाजपा केंद्र सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी आणि राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमिनदार यांच्या नेतृत्वाखाली दि. 21 मे रोजी नांदेड शहरातील आयटीआय येथे एल्गार आंदोलन करून भाजपा सरकारचा निषेध केला. या आंदोलनात चुलीवर पोळी शेकून आणि दुचाकी वाहनाला हार घालून वेगळ्या पद्धतीनेही निषेध नोंदवला.

 

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विविध वस्तुंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यातच पेट्रोल, डिझेल व गॅसच्या प्रचंड किमती भाजपा सरकारने वाढवल्या आहेत, त्यामुळे महागाईचा उद्रेक झाला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करीत मोदी सरकारच्या विरूद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. इंधनाच्या वस्तुंच्या किमती त्वरित कमी कराव्यात अशी मागणी करण्यात आली. शिवाय भाजपा सरकारचा निषेध म्हणून चुलीवर कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी पोळी शेकली व आल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच सर्वसामान्य व्यक्तीला पेट्रोल, डिझेल घेणे परवडत नसल्यामुळे दुचाकी वाहनाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी हार घातला. तसेच केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला.

 

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार, प्रदेश प्रतिनिधी कल्पनाताई डोंगळीकर, युवक प्रदेश सरचिटणीस गजानन देशमुख, युवकचे प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब भोसीकर, मनज्योतसिंघ ग्रंथी, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा इंजि. प्रांजली रावणगावकर, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रियंका कैवारे, राष्ट्रवादी युवती शहर जिल्हाध्यक्ष महुमदी पटेल, डॉ. उत्तमराव सोनकांबळे, चंद्रकांत टेकाळे, अ‍ॅड. बाळासाहेब सोनकांबळे, जितेंद्र काळे, सुनील धुमाळ, दत्ता पाटील ढगे, महंमद दानिस, आंबादास जोगदंड, संदीप क्षीरसागर, अक्षय सोनकांबळे, शेख शावेद, शफी उलरहेमान, निखील नाईक, माधव पाटील, सईदा पटेल, डॉ. उज्ज्वला सावळे, अंजली भालेराव, दीपमाला खंदारे, सरजू हातवळगे, जिलानी पटेल, इनुस खान, शेख जिलानी, सय्यद मोबीन, विक्कीसिंघ गील, रितेश पवनेकर, माधव बेंद्रीकर, ज्ञानेश्वर कदम, हनमंत नटुरे, दत्ता पारवे, कैलास कदम, संदीप राऊत, लक्ष्मण फुलझळके, गोपीनाथ केंद्रे, शिवराज पवार, आत्माराम कपाटे, प्रवीण घुले, हर्शद बिल्डर, मिर्झा बेग, मोशीन बिल्डर, सय्यद अर्शद, शेख मोशीन, शेख आतीक, शदर बिल्डर, रहेमत बिल्डर, सैफ शेख, इम्रान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

मोदी हटाव देश बचाव-धनंजय सूर्यवंशी
गॅसची किंमत प्रचंड वाढली आहे. गृहिणींना आपले घर कसे चालवावे असा प्रश्न पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या किमती प्रचंड वाढवल्या, या भाववाढीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. देशातील वाढती महागाई कमी करायची असेल तर मोदी हटाव देश बचाव याच्याशिवाय पर्याय नाही. इंधनाच्या किमती त्वरित कमी कराव्यात, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

 

हिंदू-मुस्लीम दंगे घडवण्यापेक्षा महागाई कमी करा-रऊफ जमीनदार
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सहारा घेत हिंदू-मुस्लीम दंगे होतील, असे वक्तव्य केले जात आहे. या वक्तव्याला भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये हिंदू-मुस्लीम असे दंगे घडवण्यापेक्षा महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.