डॉ. बाबासाहेब आंबेडकरही बोलले होते, मग आम्ही ही तिरूपती बालाजीवर दावा करू- चंद्रशेखर आझाद

सम्राट अशोक यांनी देशात ८४ हजार बुद्ध विहार बांधले होते. देशातील अनेक धार्मीक स्थळं बुद्ध् विहारांवर आहेत.

0

नांदेड, रयतसाक्षी: वाराणसीतील ज्ञाणव्यापी मशिदीवरूनर सध्या वाद सुरू आहे. पण मंदिर- मशिदीच्या वादाने नागरिकांचे पोट भरत नाही. नागरिकांच्या समस्या याहून अधिक गंभीर आहेत. देशाची आर्थीक स्थिती बिगडल्याने या मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचा आरोप भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर अझाद यांनी केला आहे. तस असेल तर मग सम्राट अशोक यांनी देशात ८४ हजार बुद्ध विहार बांधले होते.

 

देशातील अनेक धार्मीक स्थळं बुद्ध् विहारांवर आहेत. यामुळे भाजपने हे प्रकरण थांबवलं नाही, तर आम्ही देखील आमच्या बुद्ध विहारासांठी न्यायालयात जाऊ. न्यायालयात धाव घेतल्यास भाजपचे लोक ठिकाणावर येतील, असा इशारा चंद्रशेखर आझाद यांनी येथे दिला.

 

इतिहासच खोदून काढत असाल तर आंध्र प्रदेशातील तिरूपती बालाजी आणि झारखंड येथील शिरपुरधाम हे बुद्ध विहारांवर बांधले गेले आहेत. त्यावर देखील आम्ही दावा करू, असं अझाद म्हणाले. खोदकामच करायच असेल, तर थोड खालून करा. इथे बुद्ध् सापडतील. आणि तसं आयोध्येत अढळूनही आल आहे, असा दावा आझाद यांनी केला. भाजपकडून अशाच प्रकारे समाजात व्देष निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न केला गेला, तर आम्हीही आमचा इतिहास आणि वारसा मागण्यासाठी न्यायालयात जाऊ, आधी आम्ही त्या वारसांवर दावा करू.

 

छत्तीगडमधील शिरपूरधामची इतिहासात नोंद आहे. तिथे बौद्ध् विहार होते . अशाच प्रकारे तिरूपती बालाजी मंदिराच्या ठिकाणीही बौद्ध् विहार आहे. फक्त एवढेच नव्हे तर अशी अनेक ठिकाणं आहेत. तिथे ८४ हजार बौद्ध् स्तूप असतील, असे आझाद म्हणाले. नांदेडमध्ये अयोजीत दलित पँथरच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. यावेळी ते बोलत होते.

आझाद समाज पार्टी महापालिका निवडणूका लढवणार

भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीच महाराष्ट्र राज्यात देखील काम सुरू केलं आहे. आपली संघटना मजबूत आहे. तेव्हा आगामी महापालिका निवडणूकीत आझाद समाज पार्टी देखील उतरणार असल्याची घोषणा पक्ष प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी येथे केली. प्रस्थापितांनी जनतेला अतापर्यंत फसवलं आहे. नागरिक त्यांना वैतागले आहेत. त्यामुळे जनता आम्हाला नक्कीच साथ् देइल, समविचारी पक्षाची युती करायची की नाही हे त्यावेळी पाहू. पण आझाद समाज पार्टीने महापालिका निवडणूकीची तयारी केल्याचे चंद्रशेखर आझाद यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.