सिंदफणा नदीपात्राच्या लिलाव क्षेत्रातील विहीरी धोक्यात !

शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव, नियम डावलून रेती उपशाचा आरोप

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: दोन वर्षापासूनची स्थगित वाळू लिलाव प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आली. हाजीपूर शिवारातील सिंदफणा नदीपात्रात सुरू असलेल्या वाळू उपशामुळे शेतकऱ्यांच्या मालकीच्या विहीरींना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होत असल्याने नियमात वाळू उपसा करण्याची मागणी येथील श्रीकृष्ण् मगर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील सिंदफणा नदीच्या रेती घाटांची लिलाव प्रक्रिय संपन्न झाली. हाजीपूर शिवारातील सिंदफणा नदी पात्रात लिलाव धारकांकडून वाळू उपसा करण्यात येत आहे. दरम्यान लिलाव प्रक्रियेसाठी नागपूर मा. हरित लवास न्यायाच्या निर्देशानुसार नियमानूसार नदीपात्रातील वाळू उपशास काही प्रतिबंध जारी करण्यात आले आहेत.

 

सायंकाळी ६:०० नंतर वाळू उपसासह वाहतूकीसाठी वाहन नदीपात्रात उतरवता येणार नाहीत, वाळू उपसासाठी नदीपात्राच्या खोलीचीही मर्यादा घालून दिली आहे. रेती घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहेत यासह इतर प्रतिबंधात्मक नियमाचे लिलावधारकांकडून पालन अवश्यक आहे. पण सिंदफणा नदी पात्रात लिलाव धारकांकडून नियम डावलले जात असल्याचा आरोप श्रीकृष्ण् मगर यांनी केला आहे.

दरम्यान, वाळू उपशामुळे  नदी काठच्या मालकीच्या विहीरींना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य काळात होणारी हानी टाळण्यासाठी सबंधीत लिलाव धारकांना समज देऊन नियमात वाळू उपशाची मागणी श्रीकृष्ण् मगर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.