राष्ट्रवादी युवक पदाधिकारी निवड, आढावा बैठकीचे आयोजन- धनंजय सूर्यवंशी

जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

0

नांदेड, जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पक्ष, संघटन बांधणीसाठी जिल्ह्यातील नवीन तालुकास्तरावर नुतन पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर संघटनेमार्फत करण्यात आलेल्या विविध कामांच्या आढावा बैठकीचे शुक्रवारी दि.४ आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. पक्ष संघटनाच्या बळकटीने स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता काबीज करण्यासाठी संघटन वाढीचे काम हाती घेण्यात आले आहे. पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या जिल्हाभरातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी दि. ४ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या विचारांशी बांधील राहून होतकरू कार्यकर्त्यांसाठी पदनियुक्ती सोहळा आयोजीत आहे. बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षक आशा भिसे, पक्ष निरीक्षक निशांत वाघमारे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, माजी सभापती भगवानराव आलेगावकर, जिल्हा सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्या कल्पना डोंगळीकर, युवकचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, प्रदेश सरचिटणीस गजानन कल्याणकर, प्रेमकुमार कौशल्ये, राष्ट्रवादी युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, कार्याध्यक्ष संभाजी मुकनर, बंटी पाटील आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभणार असून उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.