भास्कर नन्नवरे यांचा आदर्श् इतरांनी घ्यावा- अजिनाथ् गवळी

यशस्वी भूमिपुत्राचा सिंदफणा अर्बनकडून सन्मान

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : तालुक्यातील पाडळी येथील भास्करराव नन्नवरे यांची उर्ध्व प्रवरा संगमनेर विभाग येथे कार्यकारी उपआभियंता पदावर बढती झाली आहे. तालुक्याच्या भूमिपुत्राचा प्रशासकिय सेवेत यशस्वी वाटचाल इतरांसाठी प्रेरनादायी आहे. भास्कर नन्नवरे यांचा आदर्श् इतरांनी घ्यावा असे प्रतिपदान सिंदफणा अर्बनचे संस्थापक, सामाजीक कार्यकर्ते आजिनाथ गवळी यांनी केले.

 

पाडळी गावचे भुमिपुत्र भास्कर नन्नवरे यांच्या प्रशासकिय सेवेतील बढतीने तालुक्याची मान उंचावली आहे. यशस्वी भूमिपुत्राचे कौतुक करून त्यांचे धैर्य वाढावे या शिवाय त्यांचा आदर्श् समाजातील नव्या पिढीने घ्यावा या उद्देशाने रविवारी दि. ५ सिंदफणा अर्बन बँकेच्या वतिने संस्थापक आजिनाथ गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत भास्कर नन्नवरे यांचा सन्मान करण्यात आला.

 

दरम्यान, भास्कर नन्नवरे यांचा आदर्श् इतरांसाठी प्रेरणादाई असल्याचे प्रतिपादन श्री गवळी यांनी केले. यावेळी बँकेचे संचालक भागवत माने, सखाराम ननवरे, सिनिअर इंजिनियर इंडो जर्मन कंपनी औरंगाबाद  रावसाहेब ननवरे, इंजि. टाटा टेलको कपंनी पुणे  बबन ननवरे, जलसंपदा विभाग नगर स्वाती ननवरे , बबिता ननवरे, अलका ननवरे,रुपेश ननवरे, रासपचे प्रशांत जगताप, नानाभाऊ बनकर, जालींदर काकडे, जालींदर बनकर, नवनाथ बनकर आदींसह बँकेचे कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.