राष्ट्रीय महामार्ग २२२ वाटमारी

मातोरी शिवारात कंटेनरच्या चालकास लूटले

0

शिरूर कासार, रयतसाक्षी:  राष्ट्रीय महामार्ग क्र३ २२२ वर वाटमाऱ्याच्या प्रकारात वाढ होत आहे. कल्याण – विशाखापट्टनम या राष्ट्रीय महार्गावर शनिवारी दि. ४ रोजी सायंकाळी जालना येथून सळया घेऊन मिडसांगवी कडे जाणाऱ्या कंटेनेर चालकास मातोरी शिवारात मोटारसायकल आडवी लावून लूटल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहन चालकाच्या फिर्यादीवरून चंकलांबा पोलीस अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शिरूर तालुक्यातून मार्गस्थ होणाऱा राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वर वाहनांची वर्दळ वाढत आहे. दोन राज्याला जोडणारा हा राशष्ट्रीय महामार्ग नांदेड, परभणी, बीड सह राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी जवळचा मार्ग म्हणून वाहन चालक वाहतूकीसाठी याच मार्गास पसंती देत असल्याने दिवसा प्रमाणे रात्रीच्या वाहतूकीत भर पडत आहे. दरम्यान महामार्गवरून वाहतूक करणाऱ्या जड वाहन चालकांना लूटीच्या प्रमाणात वाढ होत आहे.

 

शनिवारी जलना येथून कंटेनर क्र. एम एच 20 सी टी 0586  सळया भरून शिरूर कासारकडे येत होता. रात्रीच्या सुमारास मातोरी शिवारात कंटेनेर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी गाडी आडवी लावून तु आमच्या गाडीला कट का मारलास असे म्हणत चालकाला वाहनाच्या खाली उतरवले आणि लाथा बुक्याने मारहान केली. त्या नंतर अवघ्या काळी वेळात मिडसांगवी कडून आलेल्या चार चाकी वाहनातील अज्ञातांनीही मारहान करत चालका जवळील रोख १२००० रूपये रोक व एक मोबाई हिसकावून पळ काढला. चालकाच्या फिर्यादीवरून चकलकांबा पोलिसात अज्ञात अरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.