शिरूर तालुक्यात विकास कामांचा खेळ मांडियेला !

वाळू लिलाव सुरू…. तरी ही निकृष्ठ डस्ट मध्ये कामांचा सपाटा

0

शिरूर कासार, रयतसाक्षी :दर्जेदार विकास कामांसाठी उपयुक्त साहित्याचा वापर अवश्यक आहे. सिमेंट काँक्रेटच्या कामासाठी खडीप्रमाणे वाळूचा वापर अवश्यक असताना तालुक्यात शासकिय विकास कामात निकृष्ठ दर्जाच्यसा डस्टचा वापर सुरू असल्याने तालुक्यात विकास कामांचा खेळ मांडला असला तरी एरवी विकास कामांवर रान उठवणारे बेगडी लोकहितवादी चिडीचूप असल्याने संभाव्य काळात होणाऱ्या हाणीला वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

शिरूर कासार तालुक्यातील सिंदफणा नदीपात्रातील वाळू उपशाचा अधिकृत लिलाव अधिकृत सुरू आहे. सिमेंट काँक्रेटच्या दर्जेदार कामांसाठी खडी प्रमाणेच वाळूचा वापर अवश्यक असल्याचे प्रमाण इंजिनियरांकडून ठासून दिले जाते. पण तालुक्यात विविध नेत्यांच्या फंडातून सुरू असलेल्या विकास कामांचा महाकुंभात वाळूचा तसूभरही वापर केला जता नसताना इंजिनियरांकडून कागदावर धोपट दर्जा दिला जात आहे.

 

प्रत्यक्षात काँक्रेट कामात वाळू वापरावर ठाम असलेल्या इंजिनियर कडूनच कोट्यावधींचे बिले उचललण्यासाठी निकृष्ठला मुक संमिती दिली जात आहे. त्यामुळे चिरी मिरीच्या हव्यासापाई तत्वांसह कामाचा दर्जा वेशीवर टांगण्याचा निखळ प्रकार सुरू आहे. दरम्यान, शिरूर शहराच्या गल्ली बोळात नगरपरिषद प्रशासनासह विविध फंडातून विकास कामांचा धडाका सुरू आहे.

 

सिमेंट काँक्रेटच्या रस्त्यापासून इमारतीच्या बांधकामांसाठी सर्रास निकृष्ठ डस्ट वापर सुरू आहे. प्रत्यक्षात मागील कालावधीत डस्ट मिस्त्रीत कामांचे अवघ्या दोन वर्षात अस्तित्व नाहीसे झालेले असताना पुन्हा पहिले पाढे पंचावन्न या उपाधी प्रमाणे विकास कामांचा बट्याबोळ सुरू आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागात रसत्यासह बंधारे, केटीवेअर आदी सुरू असलेल्या विकास कामातही सर्रास डस्टचा वापर सुरू आहे.

 

पण स्थानिक पातळीवर पुढाऱ्यांनी जवळच्या कार्यकर्त्यांना कामाच्या खिरापती वाटप केल्याने नागरिकांच्या तक्रारींची अशा धुसरच. दरम्यान याच संधीचे गैरफायदा घेऊन विकास कामांचा सोपस्कर केला जात आहे. प्रशासनाने विकास कामासह बांधकामांसाठी वाळूची अधिकृत लिलाव प्रक्रिया राबवली असली तरी दगडांच्या चुऱ्या पासून निर्मीत डस्टचा विकास कामासाठी वापर हा कामाच्या दार्जावर कुऱ्हाड पडल्याचे निश्चित मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.