धक्कादायक: पब्जीच्या आहारी गेलेल्या सोळा वर्षीय मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या

वडिलांच्या अधिकृत पिस्तुतमधुन झाडल्या गोळ्या, दुर्गंधी सुटू म्हणून वापरले रूम रफ्रेशनरचा वापर

0

रयतसाक्षी : पब्जी गेम च्या आहारी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्या आईची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना लखनौ(उत्तर प्रदेश) येथे घडली आहे. साधना सिंह वय ४० असे त्या मृत महिलेचे नाव आहे. संतापजनक म्हणजे मुलगा दोन दिवस आणि तीन रात्री मृतदेहासोबत घरीच राहिला. त्याने आपल्या लहान बहिणीला पोलिसांना किंवा कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच मृतदेहाची दुर्गंधी कमी करण्यासाठी रूम फ्रेशनर आणि डिओडोरेंटचा वापर केल्याचेही अढळून आले आहे.

 

मंगळवारी दि.७ रोजी दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. अल्पवयीन मुलाची या प्रकरणी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. लखनौ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे पती भारतीय सैन्यदलात सुभेदार असून मेजर या पदावर कार्यरत आहेत . सध्या ते पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे सैन्यात सेवा देत आहेत.

 

पत्नी साधना सिंह व १६ वर्षाचा मुलागा आणि नऊ वर्षाची मुलगी असा त्यांचा परिवार आहे. ते लखनौमधील पंचमखेडा येथील जमुनापूरम कॉलनीत राहतात. शनिवारी रात्री साधना या झोपी गेल्या असता रात्री तीन च्या सुमारास मुलाने वडिलांची परवानाधारक पिस्तुल घेऊन आईच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. यामुळे साधना यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने छोट्या बहिणीला धमकावत दुसऱ्या खोलीत नेले. सकाळी उठल्यानंतर त्याने पुन्हा बहिणीला, जर याची माहिती पोलिसांना दिलीस तर जीवे मारील अशी धमकी दिली.

 

आईची हत्या केल्यानंतर मुलगा दोन दिवस तीन रात्री घरातच राहीला. या दरम्यान तो ज्या खोलीत आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिथे तो जाऊन पुन्हा पुन्हा पाहत होता. दुर्गंधी येऊ नये म्हणून तो खोलीत रूम फ्रेशनर व डिओडोरेंट मारत राहिला. मंगळवारी रात्री दुर्गंधी सुटल्याने त्याला भिती वाटू लागली. त्यानंतर त्याने वडिलांना फोन करून आईला कोणीतरी मारल्याचे सांगितले. आम्हा दोघंना खोलीत बंद केले होते. कसे तरी बाहेर पडल्याचा त्याने बहाणा केला.

 

त्यांनतर त्याच्या वडिलांनी शेजाऱ्यांना कॉल करत घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलसांनी दोन्ही मुलांना घरातून बाहेर आणून खोली सील केली. ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह पडला होता तिथे पिस्तुल अढळून आली आहे. दुर्गंधी कमी करण्यासाठी रूम फ्रेशनर आणि डिओडोरेंटचा वापर केल्याचेही दिसून आले. पब्जी खेळत असल्याने आई मारहाण करत होत.

 

घरातून दहा हजार रूपये देखील गायब झाले होते. हे पैसे मीच चोरल्याचा आरोप करत आईने मारले होते. या रागातूनच आईची हत्या केल्याची कबुली मुलाने पोलिसांसमोर दिली आहे. तो पब्जी गेमच्या आहारी गेला होता. सोशल मिडियावरही तो सक्रिय असायचा. पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे. पोलिस या प्रकरणी मुलाची चौकशी करत असून या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.