शिरूरच्या सनराईजचा बारावी बोर्ड परीक्षेत डंका

कु .सलोनी वाघमारे तालुक्यात प्रथम, गणित, रसायणशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्रातही सनराईजची बाजी

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी भौतिक त्यागाचा मार्ग आवलंबून अगदी छोट्याशा किरायाच्या जागेत लावलेल्या सनराईज क्लासेसच्या रोपट्याने यंदाही बारावी बोर्ड परीक्षेत डंका वाजवला आहे. सनराईजची सलोनी वाघमारे हिने ९०.६७ टक्के मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे तर गणित, रसायणशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्रातही सनराईजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाने यश मिळविले आहे. राज्यभरात इतर ठिकाणी स्थलांतरीत विद्यार्थ्यांनी सनराईजवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

भावी पिढी गुणवंत घडविण्याच्या जीद्दीने आतार दाम्त्याने शहरात सनराईज क्लासेसचे वीस वर्षापूर्वी छोटेसे रोपटे लावले. आगदीच तोकड्या किरायाच्या जागेत लावलेले सनराईज रोपट्याचे रूपांतर आता यशाच्या महावटवृक्षात झाले आहे. वीस वर्षापासून आतार दाम्पत्याने ग्रामीण भागातील विदर्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव दिला. आत्मविश्वासाच्या बळावर यश खेचून आणण्याची गुरू किल्ली म्हणजेच शिरूरचे सनराईज क्लासेस असा विश्वास विदर्थ्यांमध्ये रूजला आहे.

 

सातत्याने दहावी- बारावी बोर्ड परीक्षेत उच्च श्रेणीचे यश संपादनाची जनु काही सनराईजची परंपराच बनली आहे. अगदी सामान्य प्रतीचे विद्यार्थी असामान्य घडविण्याची जाज्वल्य ज्ञानीक कला आतार दाम्पत्यामध्ये चांगलीच रूजली असं म्हणणं वावग ठरणार नाही. वैद्यकियशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रीकीसह प्रशासकिय क्षेत्रात सनाराईजचे विदर्थी आज सक्षमपणे कार्यरत आहेत.

बोर्ड परीक्षेतील यशाच्या परंपरे नुसार यंदाही बारावी बोर्ड परीक्षेत सनराईजची विदर्थीनी कु. सलोनी रमेश वाघमारे हिने जीवशास्त्रामध्ये शंभर पैकी ९६ गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा बहूमान मिळविला आहे. त्याचबरोबर पुजा अनिल तांबे हिने गणितामध्ये शंभर पैकी ९६, जीवशास्त्रामध्ये शंभर पैकी ९५, भौतिकशास्त्रामध्ये शंभर पैकी ९२ गुण मिळविले. कु. सानिका तुकाराम माने  हीने केमिस्ट्री विषयात शंभर पैकी ९५ गुण घेतले.

 

रूतुजा नवनाथ पानखडे हिने जीवशास्त्रामध्ये शंभर पैकी ९५ गुण, निकिता गणपत तांबे हिने जीवशास्त्रामध्ये शंभर पैकी ९५ गुण, सिद्धी सखाराम गायकवाड हिने गणित विषयात शंभर पैकी ९४ गुण मिळविले आहेत. याशिवाय आयुष धनवे ९३ गुण, उमेश पाखरे ९३ गुण, भरत सवासे ९२ गुण, पठाण अल्फाज अस्लम ९२ गुण, अंजली पवार ९२ गुण, सानिका सवासे ९२ गुण, राहूल सानप ९२ गुण, अक्षय हंगे ९२ गुण, आर्यन मुरकुटे ९१ गुण, अविनाश काशीद ९० गुण, गौतम सांगळे ९० गुण, कृष्णा ढाकणे ९० गुण , स्नेहा शिंपी ९० गुण, उमा मिसाळ ९० गुण, सौंदर्या वारभुवन ९० गुण, शेख सिमरण ९० गुण, शेख तबरेज ९० गुण, भारती कुल्थे ९० गुण, आदित्य ठोंबरे ९० गुण, सागर नेटके ९० गुण, रोहित केदार ९० गुण, शेख सना ९० गुण, विवेक नितळ ९० गुण, विकास हांगे ९० गुण, सिद्धी भांडेकर ९० गुण, शेख रिहान ९० गुण, करण खोपडे ९० गुण, शिवानी तांबे ८९ गुण आदी विदर्थ्यांनी प्रथमश्रेणीचे गुण मिळवून यश संपादन केले आहे.

 

ग्रामीण भागातील विदर्थ्यांमध्ये जीद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश खेचून आणण्याची क्षमता असते गरज आहे ती तज्ञ, अनुभवी मार्गदर्शकाची. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमधील कौशल्य गुणांना वाव देण्याचे सत्कार्य सनराईजने हाती घेतल्याने गुणवंत विद्यार्थी घडत आहेत. या पूढे ही यशाची पंरपरा टिकून राहील.

आतार एस. जी.

संचालक सनाराईज क्लासेस

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.