जिल्हा परिषद भरती प्रक्रीयाचे अंमलबजावणी तात्काळ करा

राज्यातील सर्व जिल्हा परिषदा अंतर्गत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट क / ड संवर्गातील रिक्त पदांसाठी शुल्कासहित अर्ज सादर कले आहेत - तुषार देशमुख

0

नांदेड, रयतसाक्षी: ऑक्टोबर २०१७ रोजी शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत अभियंता, विस्तार अधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ सहाय्यक लिपिक, ग्रामसेवक, पशुसंवर्धन, अंगणवाडी परिचारिका, शिपाई अशा विविध क /ड संवर्गातील रिक्त पदांसाठी शुल्कासहित अर्ज सादर केले होते.

ही प्रक्रिया मागील ३ वर्षापुर्वीच घोषित झाली, त्यावर कोरोना परिस्थिती निर्माण झाली. तदनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली व वित्तीय उपाययोजना स्थगिती आदेश शासनाकडुन उठविण्यात आले.
राज्यातील विविध विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. तरी या रिक्त पदांमुळे राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढतय हि गंभीर बाब लक्षात घेता,सदर पदासाठी तब्बल तिन तिन वर्षाचा अवधी ऊलटुनही शासनाची उदासिनता तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार दिसतोय.

याव्यतिरिक्त ईतर विभागातील रिक्त पदासंदर्भात भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पण जिल्हा परिषदेअंतर्गत मागविण्यात आलेल्या रिक्त पदांसाठी आवेदनपत्र दाखल होऊनही कुठल्याही प्रकारची हालचाल दिसुन येत नाही, सदर ऊमेदवार या पदभरतीच्या प्रतिक्षेत आहे. या संथ गतीच्या प्रकियेमुळे

ऊमेदवाराचीं वयोमर्यादेत वाढ होत आहे, त्यामुळे नैराश्याग्रस्त होतायेत त्यामुळे सदर भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी अशा अाशयाची मागणी राज्यातील विविध जिल्ह्यातील, युवाशाही संघटनेच्या वतीने, तुषार देशमुख, सुरेश सावळे, महेश पाटील, कुशल देशमुख,

अमोल यवतमाळ, तुषार शेटे, आकाश साळुंखे, दिगंबर वैद्य पाटील, अश्विनी कडु, रुपाली डाखारे, श्रीकांत आडे, ऊपेद्रं सोनकुसळे, आदींनी जिल्ह्याधीकरी मार्फत मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे, ग्रामविकास मंत्रीहसनजी मुश्रीफ , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे केली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.