गोमळवाडा येथे ई-श्रम कार्ड नोंदणी कॅम्पचे आयोजन

विवध मजूरांनी मोफत नोंदणी करावी - आजीनाथ गवळी

0

शिरुर कासार, रयतसाक्षी:  गोमळवाडा येथे सर्व प्रकारच्या ग्रामीण मजूरांसाठी मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.  सामाजीक कार्यकर्ते आजिनाथ गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दि. ११  कॅम्पचे उदघाटन करण्यात आले. मजूर, कामगारांनी कॅम्पमधे मोफत नोंदणीचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गवळी यांनी केले.

भारत सरकारच्या वतीने जिल्हा कामगार कार्यालया मार्फत जिल्हाभरात ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मजूर व असंघटीत कामगारांना कामाच्या कार्यक्षेत्रात नांदेण् करता यावी या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गोमळवाडा येथे सी एस सी सेंटरच्या वतीने शनिवार दि.११ ते दि १५ या पाच दिवसात “मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी  कॅम्पचे” आयोजन करण्यात आले आहे.

 

आयोजीत कॅम्पमुळे गोमळवाडा, पिंपळनेर, हिंगेवाडी, रुपूर, रामागिरवाडी, वडाचीवाडी  परिसरातील असंघटीत कामगार यांना फायदा होणार आहे. कामगारांनी गोमळवाडा येथील्र सी एस सी सेंटरवर जाऊन या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन उदघाटन प्रसंगी गवळी यांनी केले.

 

दरम्यान उसतोड कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, लहान शेतकरी, रस्त्यावरील विक्रिते फळवाले, भाजीवाले, फेरीवाले, वाहनचालक, वृत्तपत्रविक्रेते, चहाविक्रेते, पशुपालन व कुक्कटपालन कामगार,शिलाई मशीन कामगार, रस्तेबनवनारे कामगार, सुतारकाम,  नाव्हीकाम, शेतीकाम, वीटभट्टी, प्लम्बींग,माथाडी,बांधकाम करणारे,हॉटेल कामगार,मनरेगा मजूर,ब्यूटीपार्लर,इलेक्ट्रीशीयन,पेंटर तसेच आशा व अंगणवाडीसेविका आदी काम करणाऱ्या मजूर व असंघटीत कामगार यांना या कॅम्पमधे मोफत नोंदणी करता येईल.

 

यावेळी केंद्राचे संचालक श्री.अंकुश गवळी कृष्णा बनकर,ऋषी दुधाळ यांचेसह डिगांबर कातखडे,शिवाजी बनकर,कचरु काशीद,जगन्नाथ बनकर,आशोक साळवे आदींसह कामगार, मजुरांची  उपस्थिती होती. अंकुश गवळी यांनी प्रास्ताविक, सचलन करत आभार मानले .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.