माजी मंत्री पंकजा मुंडे समर्थकांवर गुन्हा

भाजप नेत्याची गाडी आडविणे आले आंगलट

0

बीड, रयतसाक्षी : विधान परिषदेसाठी सर्व पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. भाजपनेही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भापच्या यादीमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश नाही, त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न मुंडे समर्थकांनी केला होता. या समर्थकांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विधान परिषदेसाठी भाजपने प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांना डावलले असल्याचा आरोप मुंडे समर्थकांनी केला आहे. विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या, मुंडे समर्थकांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात १२ मुंडे समर्थकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काल बीड जिल्हा दौऱ्यावर होते, दरेकर यांनी माजी आमदार विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यादरम्यान कार्यक्रम आटपून जात असताना, बार्शी रोडवरील शिवाजी धांडे नगरच्या समोर काही मुंडे समर्थकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान एका पोलीस  कर्मचाऱ्यांसह एका मुंडे समर्थकाला किरकोळ मार लागला होता.

औरंगाबादमध्येही मुंडे समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबादमध्येही समर्थकांनी नाराजी व्यक्त करत दरेकरांची गाडी अडवली होती.

या प्रकरणात आता बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये १२ मुंडे समर्थकावर गैर कायद्याची मंडळी जमवून प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवल्याच्या आरोपावरून कलम ३४१,१४३,११०,११७, १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपकडून  मुंडे भगिनींना डावलण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने मुंडे समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. काल एकाच दिवसात बीड-उस्मानाबाद सीमेवर आणि बीड शहरात या दोन ठिकाणी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्यात आला होता. विशेष म्हणजे कुठे महाभिषेक तर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.