तपास यंत्रणेला सुदबुद्धी द्या

अवैध गर्भपात प्रकरणी बीडमध्ये सामाजीक कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन

0

बीड, रयतसाक्षी : बीड मधील अवैध गर्भपात प्रकरणात, पोलिसांच्या तपासावर सामाजिक कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाची सीआयडी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी “तपास यंत्रणेला सद्बुद्धी द्या”, म्हणत बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आनोखे आंदोलन सुरू केले आहे.

 

मयत शितल गाडे प्रकरणातील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, तपासात हलगर्जीपणा बद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब आघाव यांना निलंबित करा, संबंधित प्रकरणातील आरोपींची व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मार्फत चौकशी करा, मयत नर्स सीमा डोंगरे हिची आत्महत्या की हत्या ?

 

याची सखोल चौकशी करा आदी मागण्यां आंदोलक सामाजीक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, सामाजीक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “तपास यंत्रणेला सद्बुद्धी” द्या, म्हणत अनोखं आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.