दारूच्या नशेत मुलानेच केला पित्याचा घात

दारूड्या मुलाने केलेल्या मारहाणीत व्यसनी पित्याचा मृत्यू, युसूफ वडागाव येथील घटना

0

केज, रयतसाक्षी:  वडील नेहमीच दारु पितात म्हणून मुलाने दारुच्या नशेत मारहाण केली. यामध्ये जखमी वडीलांचा मृत्यू झाल्याची घटना युसुफ वडगाव ( ता. केज ) येथे घडली आहे. विशेष म्हणजे मुलगाही दारूच्या आहारी गेलेला आहे त्यातच वडिलांनही दारूचे व्यसन असल्याने दारूनेच घात केल्याच्या भावना परिसरातून व्यक्त होत आहेत.

 

निवृत्ती कोंडीबा लगसकर ( वय ७० वर्ष ) रा. युसुफ वडगाव ( ता. केज ) असे मयताचे नाव आहे. नियमित दारु का पितात म्हणून मुलगा मल्हारी निवृत्ती लगसकर याने रविवारी ( दि. १२ ) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वडिल निवृत्ती लगसकर यांना मारहाण केली. यामध्ये पायाच्या नडघीवर मार लागला त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.  याप्रकरणी पोपट लगसकर यांच्या फिर्यादीवरून मल्हारी लगसकर याच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.